‘राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा डाव’ – दिलीप वळसे पाटील

आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा शनिवारी मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करणार होते. याच पार्श्वभूमीवर ते शुक्रवारी मुंबईत दाखल झाले, मात्र शिवसैनिकांनी मुंबईत नाकाबंदी केली असून सकाळी ९ वाजता मातोश्रीवर जाणार. मात्र, राणा दाम्पत्य अद्याप तरी मातोश्रीवर हनुमान चालिसा पठणासाठी जाऊ शकलेलं नाही. या प्रकरणी मुंबईत राजकीय वातावरण तापलेलं आहे. दरम्यान, राज्यात तातडीने राष्ट्रपती […]

‘राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा डाव’ – दिलीप वळसे पाटील

आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा शनिवारी मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करणार होते. याच पार्श्वभूमीवर ते शुक्रवारी मुंबईत दाखल झाले, मात्र शिवसैनिकांनी मुंबईत नाकाबंदी केली असून सकाळी ९ वाजता मातोश्रीवर जाणार. मात्र, राणा दाम्पत्य अद्याप तरी मातोश्रीवर हनुमान चालिसा पठणासाठी जाऊ शकलेलं नाही. या प्रकरणी मुंबईत राजकीय वातावरण तापलेलं आहे. दरम्यान, राज्यात तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. यावर, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले आहे.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा विरोधकांचा डाव आहे, अशी प्रतिक्रिया दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे. तसेच, हनुमान चालीसा आपापल्या घरी वाचा, असेही ते म्हणाले. ते म्हणाले, राज्याची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न सूर आहे. राणा म्हणजे पुढे केलेलं प्यादं आहे. असेही वळसे-पाटील म्हणाले. दरम्यान, राणा दाम्पत्यावर कायद्याच्या चौकटीत कारवाई करणार असल्याचा इशारा दिलीप वळसे-पाटील यांनी दिला आहे.

राज ठाकरे यांच्या भोंगा आणि हनुमान चालिसा वादाचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत. नवनीत राणा आणि रवी राणा या दाम्पत्याने हनुमान चालिसा पठणाला पाठिंबा देत मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करणार असं जाहीर केलं होतं. यावर शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत मातोश्री बाहेर तसेच राणा यांच्या मुंबईतील घराबाहेर ही नाकाबंदी केली होती. राणा दाम्पत्य आल्यानंतर त्यांना महाप्रसाद दिला जाईल अशी भूमिकाही शिवसैनिकांनी घेतली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number