नितीन देशमुख यांची चौकशी

महाविकास आघाडीच्या आमदारांना सातत्याने कोणत्या ना कोणत्या चौकशीला सामोरे जावे लागते आहे. याच यादीत आता अकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांचा समावेश झाला आहे. देशमुख हे अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघातील ठाकरे गटाचे आमदार आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अमरावती कार्यालयातून नोटीस पाठविण्यात आल्याचे नितीन देशमुख यांनी स्वतःच सांगितले. उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांची मंगळवारी अमरावतीच्या […]

नितीन देशमुख यांची चौकशी

महाविकास आघाडीच्या आमदारांना सातत्याने कोणत्या ना कोणत्या चौकशीला सामोरे जावे लागते आहे. याच यादीत आता अकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांचा समावेश झाला आहे. देशमुख हे अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघातील ठाकरे गटाचे आमदार आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अमरावती कार्यालयातून नोटीस पाठविण्यात आल्याचे नितीन देशमुख यांनी स्वतःच सांगितले. उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांची मंगळवारी अमरावतीच्या एसीबीच्या विभागीय कार्यालयात मालमत्ताप्रकरणी चौकशी होणार आहे. या चौकशीसाठी ते अकोला येथून निघाले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी शक्तीप्रदर्शन केले. हे लोक हुकुमशाही पद्धतीने सरकार चालवत आहेत, असा आरोप करत आम्ही कोणत्याही कारवाईसाठी तयार असल्याचेही नितीन देशमुख यांनी सांगितलं. याबाबत १७ जानेवारीला अमरावती येथे पत्रकार परिषद घेऊन याबाबत माझी भूमिका स्पष्ट करणार असल्याचे देशमुख म्हणाले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नोटिसीवर नितीन देशमुख म्हणाले की, काही दिवसांपूर्वी भावना गवळी यांनी माझ्यावर आरोप केला, तेव्हा पहिली नोटीस आली होती. त्यानंतर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान कलम ३५३ नुसार माझ्यावर गुन्हा दाखल झाला. आता अमरावती येथून एसीबी कार्यालयाची नोटीस आली. मला हे अपेक्षितच होते. ईडीची नोटीस आली तरी मी घाबरणारा नाही. मला एसीबीच्या कार्यालयातून एक फोन आला. तुमची एसीबी कार्यालयात तक्रार दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले, परंतु या नोटिशीत तक्रार कोणी केली किंवा कशाच्या आधारे करण्यात आली, याचा तपशील दिलेला नाही. माझ्याजवळ बेहिशेबी मालमत्ता नाही.

आपल्या सुरतच्या अनुभवाबाबत त्यांनी पुनरुच्चार केला. मला सुरतला नेण्यात आले तेव्हा माझ्याकडे कपडे नव्हते. मी गेलो त्याच कपड्यांवर सुरतहून माघारी परतलो. आजदेखील मला अटक होण्याची शक्यता आहे. त्याच तयारीने मी निघालो आहे. सरकार हुकूमशाही पद्धतीने चालवले जात आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही कारवाईसाठी तयार आहोत, असंही नितीन देशमुखांनी स्पष्ट केलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number