ममतांचा मुंबईत बोलावून अपमान

मुंबई,१ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी :  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मोदी विरोधकांच्या पत्रकार परिषदेसाठी हॉलमध्ये आल्या असत्या त्यांना बसायला साधी खुर्ची सुद्धा कुणी दिली नाही. यामुळे, संतापलेल्या ममता यांनी निघून जायचा पवित्रा घेतला. ममता यांना पवारांनी हात धरून थांबवण्याचा प्रयत्न केला खरा पण, ममता यांचा राग इतका होता की, त्यांनी कुणाचे काहीही ऐकले नाही. […]

ममतांचा मुंबईत बोलावून अपमान

मुंबई,१ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी :  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मोदी विरोधकांच्या पत्रकार परिषदेसाठी हॉलमध्ये आल्या असत्या त्यांना बसायला साधी खुर्ची सुद्धा कुणी दिली नाही. यामुळे, संतापलेल्या ममता यांनी निघून जायचा पवित्रा घेतला. ममता यांना पवारांनी हात धरून थांबवण्याचा प्रयत्न केला खरा पण, ममता यांचा राग इतका होता की, त्यांनी कुणाचे काहीही ऐकले नाही. ममता चिडलेल्या बघून उद्धव आणि राऊत यांनी तोंड फिरवून घेतले. मात्र, यजमान असलेल्या उद्धव यांनी ममता यांना सन्मानाने खुर्ची उपलब्ध करून देण्याचे सौजन्यही दाखवले नाही. त्यामुळे, ममता निघून गेल्या.

खुर्ची नाही म्हणून ममता रुसल्या

असा झाला ममतांचा अपमान

मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून इंडिया आघाडीची बैठक सुरु आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील दिग्गज नेते मुंबईत दाखल होत आहेत. या बैठकीला देशभरातील २८ राजकीय पक्षांचे ६३ प्रतिनिधी हजर आहेत. यामध्ये ११ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्यासह पश्चिम बंगालच्या मुख्मंत्री ममता बॅनर्जी देखील या बैठकीला उपस्थित होत्या.

बैठकीमधून समोर आलेल्या व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी खुर्चीच्या शोधात असताना शरद पवारांनी त्यांना आपली खुर्ची देवू केली होती. ममता बॅनर्जी यांचा हात पकडून पवारांनी त्यांना खुर्चीवर बसवण्यासाठी प्रयत्नही केला. परंतु ममता बॅनर्जी यांनी आपला हात सोडवत त्यांच्या खुर्चीवर बसण्यास नकार दिला आणि दुसरीकडे खुर्चीच्या शोधात निघून गेल्या. यानंतर शरद पवारही मिश्किलपणे हसले. त्यावेळी उद्धव ठाकरे, अखिलेश यादव हे देखील उपस्थित होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number