जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
विराट अनुष्का यांचा मंगळवारी मुंबईत शानदार रिसेप्शन सोहळा पार पडला. मुंबईतली रिसेप्शन पार्टी ही खास क्रिकेट विश्वातील आणि बॉलिवूडमधील सिने तारकांसाठी आयोजित करण्यात आली होती.
विराट अनुष्काचं हे ग्रॅण्ड रिसेप्शन मुंबईच्या ‘द सेंट रेजिस’ या हॉटेलमध्ये पार पडले. यावेळी अनेक दिग्गजांनी रिसेप्शन सोहळ्याला उपस्थिती लावल्याचे पाहायला मिळाले.
तसेच, अनेक उद्योगपती देखील या रिसेप्शन सोहळ्यात पाहायला मिळाले. या पार्टीत विरुष्काने खास पेहराव केला होता. तसेच, अनेक सिने कलाकारांनी ताल धरला होता.