कल्याण पूर्वेतील काटेमानीवली परिसरात गावगुंड कशा प्रकारे दहशत माजवत आहेत, याचंच प्रात्यक्षिकच सीसीटीव्हीद्वारे पाहायला मिळालं आहे. एका बिल्डींगच्या गेटवरच गावगुंडांनी कार उभी केली होती. ही कार गेटापासून बाजूला काढण्यासाठी एका नागरिकाने विनंती केली असता त्याला बेदम मारहाण करण्यात आली.
स्थानिक गावगुंड प्रथमेश उर्फ पप्पी गवळीला यांना आपली कार हटवायला सांगितल्याचा एवढा राग आला की त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने निष्पाप रमेश गायकवाड यांना आपल्या गाडीत ठेवलेल्या लोखंडी रॉडने मारहाण केली.
हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून कोळसेवाडी पोलीस गुन्हा दाखल करून पप्पी गवळी आणि त्याच्या साथीदाराचा शोध सुरु केला आहे.
पप्पीने या पूर्वीही अशा प्रकारे अनेक जणांना काहीही कारण नसताना अशाच किरकोळ गोष्टींवरून मारहाण केली आहे.
आता तर मारहाणीचं दृश्यही सीसीटीव्ही मध्ये कैद झालं आहे. त्यामुळे आतातरी पोलीस पप्पी गवळी विरोधात कारवाई करणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.