‘अजित पवारांवर अन्याय झाला’

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अखेर मोठा फेरबदल करण्यात आला आहे. शरद पवार यांनी दिल्लीत घोषणा करत सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड केली आहे. शरद पवार यांनी अजित पवार यांच्यावर कोणतीही जबाबदारी दिलेली नाही यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. अजित पवार यांच्यावर अन्याय झाला, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी […]

‘अजित पवारांवर अन्याय झाला’

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अखेर मोठा फेरबदल करण्यात आला आहे. शरद पवार यांनी दिल्लीत घोषणा करत सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड केली आहे. शरद पवार यांनी अजित पवार यांच्यावर कोणतीही जबाबदारी दिलेली नाही यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. अजित पवार यांच्यावर अन्याय झाला, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. राष्ट्रवादीने आज सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त केले. मात्र अजित पवार यांच्यावर कोणतीही जबाबदारी दिली नाही, उद्धव ठाकरेंना ज्याप्रमाणे आदित्य यांच्याशिवाय काही चालत नाही, त्याप्रमाणे शरद पवारांना सुप्रिया यांच्याशिवाय काही चालत नाही, असेच दिसत असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर अन्याय झाला, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. तसेच मागे वाय. बी. चव्हाण सेंटरला जे घडलं ते तमाशाचं वगनाट्य होतं, अशीही टीका बावनकुळे यांनी यावेळी केली. जसं ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना त्यांचा मुलगा आदित्य ठाकरेंशिवाय दुसरं कुणी चालत नाही, तसं शरद पवार यांना मुलगी सुप्रिया सुळे यांच्याशिवाय कुणी चालत नाही, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

“मी अजित दादा यांच्याबद्दल काहीच बोलू शकणार नाही. कारण अजित दादा हे खऱ्या अर्थाने त्यांच्या पक्षाचे नेते आहेत. त्यांनी ते ठरवायचं आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं की अजित पवार आणि छगन भुजबळ यांची निवड महाराष्ट्राकरता बरी झाली असती. मला अजित पवार यांच्या नाराजीबद्दल काही माहिती नाही. मला त्यांच्या नाराजीबद्दल काही सांगायचं नाही. पण मला एवढं माहिती आहे की, अजित दादा कार्यक्षम आहेत. छगन भुजबळ कार्यक्षम आहेत”, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number