पतीने आपल्या गरोदर पत्नीला दिले एचआयव्ही पॉझिटिव्हचे इंजेक्शन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   पतीने गरोदर पत्नीला आपल्या आईचं एचआयव्ही पॉझिटिव्ह रक्त चढवल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना मुंबईमध्ये घडली आहे. यामुळे महिलेचा गर्भपात झाला आहे.   या प्रकरणी वांद्रा-कुर्ला पोलिसांनी आरोपी व्यक्तीला अटक केली आहे. अभिमन्यु कांबळे असे आरोपी पतीचं नाव आहे.   अभिमन्यु आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद सुरू होता. यादरम्यान पत्नीला काही टोचल्याचं जाणवलं. […]

पतीने आपल्या गरोदर पत्नीला दिले एचआयव्ही पॉझिटिव्हचे इंजेक्शन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

पतीने गरोदर पत्नीला आपल्या आईचं एचआयव्ही पॉझिटिव्ह रक्त चढवल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना मुंबईमध्ये घडली आहे. यामुळे महिलेचा गर्भपात झाला आहे.

 

या प्रकरणी वांद्रा-कुर्ला पोलिसांनी आरोपी व्यक्तीला अटक केली आहे. अभिमन्यु कांबळे असे आरोपी पतीचं नाव आहे.

 

अभिमन्यु आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद सुरू होता. यादरम्यान पत्नीला काही टोचल्याचं जाणवलं. त्यावेळी तिला इंजेक्शन दिसले. यावेळी तिच्याजवळ अभिमन्यु उभा होता. अभिमन्युची बहिण नर्स असून तिच्या साहाय्याने पत्नीला त्याने आईचं एचआयव्ही पॉझिटिव्ह रक्त टोचल्याचे पोलीसांनी सांगितले. याप्रकऱणी पोलिसांनी अभिमन्युच्या बहिणीलाही ताब्यात घेतले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number