बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढली

नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, नांदगाव, मनमाड बाजार समितीत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाली आहे. यामुळं दरात घसरण झाली आहे. सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. कारण कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली असून, कांद्याची कवडीमोल दरानं विक्री होत आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका पडला आहे. दरम्यान, कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी सरकारनं शेतकऱ्यांना ३५० रुपयांचे अनुदान देण्याचा […]

बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढली

नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, नांदगाव, मनमाड बाजार समितीत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाली आहे. यामुळं दरात घसरण झाली आहे. सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. कारण कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली असून, कांद्याची कवडीमोल दरानं विक्री होत आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका पडला आहे. दरम्यान, कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी सरकारनं शेतकऱ्यांना ३५० रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला होता. हे अनुदान मिळण्याची 31 मार्च शेवटची तारीख आहे.

कांद्याच्या दरात घसरण होऊ नये अशी शेतकऱ्याची मागणी आहे. मात्र, वाढत्या आवकेचा परिणाम दरांवर होतोय. मागील काही आठवड्यांपासून कांद्याला सरासरी ४०० ते ५०० रुपयांचा दर मिळत आहे. त्यामुळं शेतकरी त्रस्त झाले आहेत. दरम्यान कांद्याच्या दरात वाढ होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. लाल कांद्याला प्रती क्विंटल ४०० ते ६०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तर उन्हाळ कांद्याला प्रति क्विंटल ५०० ते ७०० रुपयां भाव मिळत आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं प्रतिक्विंटल ३५० रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. हे अनुदान प्रति शेतकरी २०० क्विंटलच्या मर्यादेत दिलं जात आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्री केला त्याच ठिकाणी अर्ज करावा लागत आहे. १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या काळासाठीच हे अनुदान मिळणार आहे. त्यामुळं आजचा शेवटचा दिवस आहे. हे अनुदान पुढच्या ३० दिवसात हे वाटप करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number