मेळघाटातील आदिवासींच्या रोजगारासाठी मोठा स्थलांतर होताना पाहतो. मेळघाटातील आदिवासींना स्थानिक ठिकाणी रोजगार मिळावा या उद्देशाने मनरेगाच्या माध्यमातून येथील आदिवासी जमातींना रोजगार दिला जातो. तसेच यासोबतच त्यांना मनरेगाच्या कामावर काम करणाऱ्या मजुरांना जेवणसुद्धा देण्याची सुविधा शासनाने केली आहे.
दरम्यान अमरावतीच्या खासदार नवनीत राणा मेळघाट दौऱ्यावर असताना त्यांनी या भागाची पाहणी केली. यावेळी कंत्राटदार मजुरांना अत्यंत निकृष्ट दर्जाचे जेवण मजुरांना देत असल्याची माहिती मजुरांनी नवनीत राणा दिली. जनावरही हे अन्न खाऊ शकत नाहीत, असे निकृष्ट दर्जाचे जेवण मजुरांना देण्यात येते. त्यामुळे यावरून खासदार राहुल राणा यांनी याबाबत लोकसभेत आवाज उचलला जाणार असल्याचे आश्वासन मजुरांना दिले आहे.