INDvsAUS,2nd ODI : पंत ऐवजी ‘या’ खेळाडूचा टीम इंडियामध्ये बॅक-अप किपर म्हणून समावेश

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी वनडे आज राजकोट येथे खेळण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या वनडेत टीम इंडियाचा १० विकेटने दारुण पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने ३ मॅचच्या सीरिजमध्ये १-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियात ऋषभ पंत ऐवजी केएस भरत याला संधी देण्यात आली आहे. केएस भरतला टीममध्ये बॅकअप कीपर म्हणून समावेश करण्यात […]

INDvsAUS,2nd ODI : पंत ऐवजी  ‘या’ खेळाडूचा टीम इंडियामध्ये बॅक-अप किपर म्हणून  समावेश

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी वनडे आज राजकोट येथे खेळण्यात येणार आहे.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या वनडेत टीम इंडियाचा १० विकेटने दारुण पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने ३ मॅचच्या सीरिजमध्ये १-० अशी आघाडी घेतली.

दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियात ऋषभ पंत ऐवजी केएस भरत याला संधी देण्यात आली आहे.

केएस भरतला टीममध्ये बॅकअप कीपर म्हणून समावेश करण्यात आला आहे. याबाबतची माहिती बीसीसीआयने ट्विटद्वारे दिली आहे.

पहिल्या वनडेमध्ये ऋषभ पंतला बॅटिंग दरम्यान दुखापत झाली होती. मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये ४४ ओव्हरदरम्यान पॅट कमिन्सच्या बॉलवर पंतला दुखापत झाली होती.

कमिन्सने टाकलेला बॉल पंतच्या बॅटला लागून हेल्मेटला लागला होता. त्यानंतर पंतच्याऐवजी केएल राहूलने विकेटकीपींगची धूरा सांभळली होती.

पंत दुखापतग्रस्त झाल्याने टीममध्ये विकेटकीपर म्हणून संजू सॅमसनला संधी देण्यात येईल , असे तर्कवितर्क लावण्यात येत होते.

परंतु संजूला वगळल्याने अनेक क्रिकेटप्रेमींच्या भुव्या उचांवल्या आहेत.

दरम्यान टीम इंडियाचा पहिल्या मॅचमध्येच पराभव झाला.

त्यामुळे मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी टीम इंडियासमोर आज ‘करो मरो’ ची परिस्थिती असणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number