जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
दादरच्या इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या उभारणीसाठी बुधवारी मेसर्स शापूरजी पालनजी को प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची नियुक्ती करण्यात आलीये.
बुधवारी नागपूर येथे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची कार्यकारी समिती आणि राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक यांच्या बैठकीत शापूरजी-पालनजी कंपनीची नियुक्ती निश्चित करण्यात आलीये.
या बैठकीत डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकासह मेट्रो २ब, मंडाले येथील मेट्रो आगाराच्या विविध कामांसाठी कंत्राटदार नेमण्यात आलेयेत.