इंद्रायणीचे पावित्र्य धोक्यात, नागरिकांच्या घरात दूषित पाणी

जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी अलंकापुरी आळंदीत पाणी प्रश्न गंभीर बनत चाललाय. आळंदीतील इंद्रायणी नदीत मैला मिश्रित आणि रसायन मिश्रित पाणी मिसळलंय. त्यामुळे आळंदीकरांच्या घरात प्रदूषित पाणी येतंय. मोक्षप्राप्तीसाठी याच इंद्रायणीत भाविक स्नान करतात. पण, या इंद्रायणीची अवस्था गटार गंगेसारखी झालीय. रसायन मिश्रित पाणी आणि मैला मिश्रित पाण्यामुळे माऊलींच्या दारी समस्या भारी अशी काहीशी परिस्थिती आळंदी […]

इंद्रायणीचे पावित्र्य धोक्यात, नागरिकांच्या घरात दूषित पाणी

जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी

अलंकापुरी आळंदीत पाणी प्रश्न गंभीर बनत चाललाय. आळंदीतील इंद्रायणी नदीत मैला मिश्रित आणि रसायन मिश्रित पाणी मिसळलंय. त्यामुळे आळंदीकरांच्या घरात प्रदूषित पाणी येतंय.

मोक्षप्राप्तीसाठी याच इंद्रायणीत भाविक स्नान करतात. पण, या इंद्रायणीची अवस्था गटार गंगेसारखी झालीय.

रसायन मिश्रित पाणी आणि मैला मिश्रित पाण्यामुळे माऊलींच्या दारी समस्या भारी अशी काहीशी परिस्थिती आळंदी शहराची झालीय.

पवित्र इंद्रायणी नदीपात्रात घाणीचे साम्राज्य पसरल्याने इंद्रायणीचे पावित्र्य धोक्यात येऊ लागलंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number