इंडिगो विमानाचे तिकीट व्हॉट्सअॅपवर काढता येणार

आता इंडिगो विमान कंपनीने व्हॉट्सअॅपवर ग्राहकसेवा सुरू केली आहे.

इंडिगो विमानाचे तिकीट व्हॉट्सअॅपवर काढता येणार

मुंबई  : आर्टिफिशियल इंटेलिजन्स या सध्याच्या काळात सर्वाधिक चर्चेत असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करत ग्राहकांना अधिक सुलभ सेवा देण्यासाठी आता इंडिगो विमान कंपनीने व्हॉट्सअॅपवर ग्राहकसेवा सुरू केली आहे. कंपनीच्या व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून विमान प्रवाशांना त्यांच्या तिकिटाचे बुकिंग करता येईल, तसेच चेक-इन, जागेची निवड, तसेच अन्य काही सुविधा वापरता येतील. विमान प्रवासासाठी प्रवाशांना ज्या नियमित सुविधांची गरज असते, अशा सर्व सुविधा या चॅटबॉटच्या माध्यमातून मिळणार आहेत. या खेरीज जर अन्य काही सेवा किंवा इतर सहाय्य आवश्यक असेल, तर तेही या चॅटबॉटच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number