भारत सरकारने गहू निर्यातीवर तडकाफडकी बंदी घातली आहे. चीन भारताच्या गव्हाची छुपी चोरी करत आहे. गव्हाच्या बाजारात चीनची कुरघोडी करत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली असल्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
भारताने इतर देशांना त्यांच्या अन्न सुरक्षेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दिलेल्या परवानगीच्या आधारावर आणि संबंधित देशांच्या सरकारच्या विनंतीनुसार निर्यात करण्यास परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने कृषी आणि प्रोसेस्ड फूड निर्यात विकास प्राधिकरणाने (एपीईडीए) दिली आहे आहे.
भारताने २०२१-२२मध्ये गव्हाची विक्रमी निर्यात केली आहे. भारताने ७ दशलक्ष टन गहू निर्यात केला आहे. मागील आर्थिक वर्षात भारताने एकूण शिपमेंटपैकी सुमारे ५० टक्के गहू बांगलादेशला निर्यात केला आहे.
दरम्यान, गहू निर्यातीबाबत गहू उत्पादक राज्यांमध्ये निर्यातीबात बैठक आयोजित करण्यात येणार आहे.