भारतीय लष्कराच्या चीता हेलिकॉप्टरला भूतानमध्ये अपघात, 2 पायलटचा मृत्यू

भारतीय लष्कराचं चीता हेलिकॉप्टरला भूतानमध्ये अपघात झाला. अपघातात हेलिकॉप्टरमधील दोन्ही पायलटांचा मृत्यू झाला आहे. मृतकांपैकी एक भारतीय तर एक भूतान लष्कराचा अधिकारी आहे. भूतानच्या लष्करी अधिकाऱ्यांना हेलिकॉप्टर उड्डाणाचं प्रशिक्षण देताना हा अपघात झाल्याचं लष्करी प्रवक्त्यांनी सांगीतल आहे. हेलिकॉप्टरने उड्डाण घेतल्यानंतर काही वेळात रडावरुन हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला. भूतानवरुन अरुणाचल प्रदेशकडे हेलिकॉप्टर चाललं होत. आणि अचानकच हे […]

भारतीय लष्कराच्या चीता हेलिकॉप्टरला भूतानमध्ये अपघात, 2 पायलटचा मृत्यू

भारतीय लष्कराचं चीता हेलिकॉप्टरला भूतानमध्ये अपघात झाला. अपघातात हेलिकॉप्टरमधील दोन्ही पायलटांचा मृत्यू झाला आहे. मृतकांपैकी एक भारतीय तर एक भूतान लष्कराचा अधिकारी आहे. भूतानच्या लष्करी अधिकाऱ्यांना हेलिकॉप्टर उड्डाणाचं प्रशिक्षण देताना हा अपघात झाल्याचं लष्करी प्रवक्त्यांनी सांगीतल आहे.

हेलिकॉप्टरने उड्डाण घेतल्यानंतर काही वेळात रडावरुन हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला. भूतानवरुन अरुणाचल प्रदेशकडे हेलिकॉप्टर चाललं होत. आणि अचानकच हे हेलिकॉप्टर खाली कोसळलं. या अपघातात दोन्ही पायलट ठार झाले आहेत.

मृतकांमध्ये एक भारतीय,तर भूतानच्या एका लष्करी अधिकाऱ्याचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. भूतानच्या पायलटला प्रशिक्षण देताना हा अपघात झाला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number