वृत्तसंस्था, नवी दिल्ली
दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी. पण रणांगण आहे ते चॅम्पियन्स ट्रॉफीचे. क्रिकेटफॅन्ससाठी आज सुपर संडे ठरणार आहे.
कारण क्रिकेटच्या महायुद्धात आमनेसामने उभे ठाकणार आहेत. दोन कट्टर प्रतिस्पर्धी. जिंकू किंवा मरु याच उद्देशानं उतरणार आहेत.
आज चॅम्पियन ट्रॉफीमध्ये मुकाबला आहे तो भारत आणि पाकिस्तानमध्ये. सीमारेषेवर लढल्या जाणाऱ्या युद्धासारखंच त्वेषानं लढलं जाणारं युद्ध इंग्लंडच्या रणांगणात
दिसणार आहे.
एजबस्टनमधली ही लढाई म्हणजे क्रिकेटरसिकांसाठी पर्वणीच. पाकिस्तानला ठेचण्यासाठी विराट ब्रिगेडनंही रणनिती आखली आहे.
मोहम्मह आमीर, जुनेद खान आणि वहाब रियाझ या वेगवान त्रिकुटाला रोखण्यासाठी खास व्युहरचना आखली.
विराटनं प्रॅक्तिसदरम्यान रवींद्र जाडेजाला आमिरसारखीच बॉलिंग करायला सांगितली.
मॅच फिक्सिंगमुळे मोहम्मद आमीर क्रिकेटपासून बाहेर होता. पण टीम इंडियासाठी हा मोठा धोका ठरू शकतो.