सध्या सर्व प्रकारच्या खेळांमध्ये भारतीय मुलींच नाव उंचावर पाहायला मिळत आहे. अशातच स्केटिंगच्या जगात भारतीय स्केटर सृष्टी धर्मेंद्र शर्माने आश्चर्यचकित करणारा विक्रम प्रस्थापित केला आहे. तिने अवघ्या 7.46 सेकंदात उतरत्या खांबाखाली लिम्बो स्केटिंग करून 50 मीटर अंतर पूर्ण करत अद्भुत पराक्रम केला आहे. यावेळी 50 मीटरपेक्षा जास्त वेगाने उतरत्या खांबाखाली खेळाडूने स्केट्स घालून, खाली वाकून लिम्बो स्केटिंग करायची होती. यावेळी खेळाडूने वेग असला तरी खांबांना न धडकता हा पल्ला गाठायचा होता. ज्यात भारतीय स्केटर सृष्टी धर्मेंद्र शर्मा अव्वल ठरली.
सृष्टी धर्मेंद्र शर्मा ही 18 वर्षांची असून 2015 पासून, ती अनेक विक्रम मोडत आहे. 11 वर्षांच्या सृष्टीने 25 मीटरपेक्षा जास्त उंचीवर सर्वात कमी उंचीवर असलेल्या 25 बारखाली यशस्वीरित्या स्केटिंग करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पहिले स्थान पटकावले. आजपर्यंत, कोणीही हा विक्रम मोडू शकलेले नाही. सृष्टी धर्मेंद्र शर्माची कामगिरी केवळ एक विक्रम नाही तर ती तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत देखील आहे.
हेही वाचा- IND vs NZ T20 Final : “तेच स्टेडियम तोच पंच” टी20 फायनलसाठी अंपारची घोषणा; चाहत्यांची धाकधूक वाढली
लिम्बो स्केटिंग म्हणजे काय?
लिम्बो स्केटिंग हा रोलर स्केटिंगचा एक विशेष प्रकार आहे. या खेळात सहभागी स्केट्स घालतात आणि जमिनीच्या अगदी जवळ ठेवलेल्या आडव्या पट्ट्याखाली वाकतात. हा खेळ पारंपारिक लिम्बो नृत्यासारखाच आहे, परंतु सहभागी स्केट्सवर संतुलन राखून पुढे जातात. शरीर जवळजवळ जमिनीला समांतर आहे, त्यामुळे संतुलन राखणे अत्यंत कठीण होते. म्हणून, त्याला लवचिकता, चपळता आणि उत्तम वेग यांचे उल्लेखनीय संयोजन आवश्यक आहे.
Fastest time to limbo skate under descending poles over 50 m – 7.46 seconds achieved by Shrishti Dharmendra Sharma (India) pic.twitter.com/h0UvN0jIDv — Guinness World Records (@GWR) March 6, 2026