दीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचा शाही विवाहसोहळा इटलीतील लेक कोमो इथे 14 आणि 15 नोव्हेंबर पार पडला. या विवाहसोहळ्याची चर्चा देशभरात झाली. पारंपरिक कोंकणी आणि शीख विवाहपद्धत ‘आनंद कारज’, अशा दोन्ही पद्धतीने दीप-वीरचा विवाहसोहळा संपन्न झाला. परंतु दीपिका – रणवीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर आक्षेप घेतला जात आहे. इटलीतील लेक कोमो परिसरातील विला डेल बाल्बीआनेलो […]

दीप-वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर शीख समुदायाचा आक्षेप

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचा शाही विवाहसोहळा इटलीतील लेक कोमो इथे 14 आणि 15 नोव्हेंबर पार पडला. या विवाहसोहळ्याची चर्चा देशभरात झाली. पारंपरिक कोंकणी आणि शीख विवाहपद्धत ‘आनंद कारज’, अशा दोन्ही पद्धतीने दीप-वीरचा विवाहसोहळा संपन्न झाला. परंतु दीपिका – रणवीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर आक्षेप घेतला जात आहे.

इटलीतील लेक कोमो परिसरातील विला डेल बाल्बीआनेलो या ठिकाणी दीप- वीरचा विवाहसोहळा पार पडला. 14 तारखेला कोंकणी पद्धतीने तर 15 तारखेला ‘आनंद कारज’ पद्धतीने लग्नाचे विधी पार पडले.

randeep-wedinfissue.png

‘आनंद कारज’ या विवाहपद्धतीनुसार रणवीर-दीपिकाला गुरुद्वारामध्ये जाणं भाग होतं. पण त्यांनी तसे न करता थेट विवाहस्थळीच गुरु ग्रंथ साहिब आणलं. शीख धर्मीयांकडून पवित्र मानले जाणारे गुरु ग्रंथ साहिब गुरुद्वाराबाहेर नेले जात नाही. म्हणूनच याची तक्रार ‘अकाल तख्त’कडे केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे यावर आता दीप- वीर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

इटलीतील लग्नसोहळ्यानंतर ही नवविवाहित जोडी मुंबईत परतली आहे. दीपिका-रणवीर आपल्या मित्र-परिवारासाठी मुंबई आणि बेंगळुरूत स्वागत सोहळा आयोजित करणार आहेत.

 ‘आनंद कारज’ म्हणजे ?

लग्नाच्या बंधनात दोन मनांसोबतच दोन कुटुंबही जोडली जातात हा महत्त्वाचा मुद्दा आनंद कारजच्या माध्यमातून लक्षात येतो. या विवाहपद्धतीमध्ये वधू आणि वराची जन्मपत्रिका जुळणे गरजेचे नसते. हिंदू विवाहपद्धतीमध्ये लग्न, मुहूर्त या गोष्टींना फार महत्त्वं दिले जाते. पण शीख विवाहपद्धतीत हे चित्र काहीसं वेगळं आहे. धर्मगुरुच्या आस्थेच्या बळावरच आनंद कारजमध्ये म्हणजे शीथ संस्कृतीत लग्नगाठ बांधली जाते. याशिवाय या लग्नसोहळ्यात हिंदूंप्रमाणे सप्तपदी, सात फेरे यांसारख्या संकल्पना नसतात. या विवाहपद्धतीत सात ऐवजी चार फेरे घेत नवदाम्पत्य सहजीवनाच्या बंधनात बांधले जातात.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number