भारताचे क्षेपणास्त्र ९ मार्चला पाकिस्तानच्या हद्दीत १२४ किमी आत पडल्याचे भारताच्या संरक्षण मंत्रालयाने मान्य केले आहे. आज सायंकाळी संरक्षण मंत्रालयाने याबाबत निवेदन जारी केले आहे.
संरक्षण मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे, भारताकडून ही घटना अपघातामुळे घडली आहे. ही घटना ९ मार्च रोजी नियमित देखभाली दरम्यान तांत्रिक कारणांमुळे घडली आहे. सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत. या घटनेबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पाकिस्तानी सैन्याची मीडिया ब्रांच इंटर-सर्व्हिसेसचे डीजी मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, भारताने पाकिस्तानमध्ये सुपर सॉनिक फ्लाइंग ऑब्जेक्ट म्हणू शकतात. त्यात कुठला दारूगोळा नव्हता. त्यामुळे कोणतीही हानी झाली नाही.