भारताची पाकीस्तानवर कारवाई, रॉकेट-तोफांच्या सहाय्याने अनेक चौक्या उद्ध्वस्त

वृत्तसंस्था, नवी दिल्लीएलओसीवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं अनेकदा उल्लंघन केलं जातं असतं. परंतू आज भारताने पाकीस्तान विरोधात मोठी कारवाई केली. जम्मू-काश्मीर जवळील नियंत्रण रेषेवर(LOC)भारताने रॉकेट आणि तोफांच्या सहाय्याने पाकिस्तानच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त केल्याचं आहेत. पाकिस्तानविरोधातील ही कारवाई भारताने अगदी यशस्वी रीत्या पार पाडली आहे. या कारवाईचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ मेंढर सेक्टर भागातील आहे. या […]

भारताची पाकीस्तानवर कारवाई, रॉकेट-तोफांच्या सहाय्याने अनेक चौक्या उद्ध्वस्त

वृत्तसंस्था, नवी दिल्ली
एलओसीवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं अनेकदा उल्लंघन केलं जातं असतं. परंतू आज भारताने पाकीस्तान विरोधात मोठी कारवाई केली. जम्मू-काश्मीर जवळील नियंत्रण रेषेवर(LOC)भारताने रॉकेट आणि तोफांच्या सहाय्याने पाकिस्तानच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त केल्याचं आहेत. पाकिस्तानविरोधातील ही कारवाई भारताने अगदी यशस्वी रीत्या पार पाडली आहे. या कारवाईचा व्हिडीओ समोर आला आहे.
हा व्हिडीओ मेंढर सेक्टर भागातील आहे. या कारवाईत भारतीय सैनिकांनी पाकिस्तानी चौक्यांसह तेथील अनेक बंकरे देखील उद्ध्वस्त केले आहेत.

पाकिस्तानला त्यांच्या कामासाठी त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराच्या स्थानिक कमांडर्सना पूर्णपणे मोकळीक देण्यात आली आहे.

गेल्या 50 दिवसात एलओसीवर भारतीय लष्कराने पाकिस्तानला दिलेल्या प्रत्युत्तरात किमान 20 पाकिस्तानी सैनिक ठार झाले, तर सहाहून अधिक पाक सैनिक जखमी झाले.

भारतीय सैन्याच्या गोळीबारामुळे पाकिस्तानने एलओसीजवळील त्यांच्या परिसरात रेड अलर्ट जारी केला असून दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यास सोपे जावे म्हणून पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, दहशतवाद्यांना रोखण्यासाठी भारतीय लष्कराकडून एलओसीवर वेगवेगळी चालवलं जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number