Indian Badminton Jwala Gutta : भारतीय बॅडमिंटन स्टारचं मोठं पाऊल! सरकारी रुग्णालयांना दान केले तब्बल 60 लिटर दूध

आईच्या दूधात बाळाच्या विकासासाठी सर्व पोषकतत्व असतात. मात्र काही नवजात बाळांना आईकडून मिळणारे हे अमृत मिळतचं नाही, अशा मुलांसाठी माजी भारतीय बॅडमिंटनने पुढाकार घेतला आहे.

Indian Badminton Jwala Gutta : भारतीय बॅडमिंटन स्टारचं मोठं पाऊल! सरकारी रुग्णालयांना दान केले तब्बल 60 लिटर दूध

आईच दूध बाळासाठी अमृतासमान असतं. आईच्या दूधात बाळाच्या विकासासाठी सर्व पोषकतत्व असतात. मात्र काही नवजात बाळांना आईकडून मिळणारे हे अमृत मिळतचं नाही, अशा मुलांसाठी माजी भारतीय बॅडमिंटनने पुढाकार घेतला आहे. माजी भारतीय बॅडमिंटनने सरकारी रुग्णालयांना जवळपास 60 लिटर स्वतःचे दूध दान केले आहे. भारतीय बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाने खुलासा केला आहे की, तिने बाळंतपणानंतरच्या पहिल्या वर्षात हैदराबाद आणि चेन्नई येथील सरकारी रुग्णालयांना सुमारे 60 लिटर आईचे दूध दान केले. वयाच्या 51 व्या वर्षी सार्वजनिक ठिकाणी दिसलेल्या या बॉलिवूड स्टारचा हा उपक्रम खरच कौतुकास्पद आहे. 

हेही वाचा- Jailer 2 Set Accident: तमिळ सिनेसृष्टी हादरली; रजनीकांत यांच्या ‘जेलर 2’ च्या सेटवर 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू, कारण समोर
यावेळी तिने तिच्या सोशल मीडियावर माहिती देत म्हटलं की,”मी माझ्या प्रसूतीनंतरच्या पहिल्या वर्षात हैदराबाद आणि चेन्नई येथील सरकारी रुग्णालयांना सुमारे ६० लिटर आईचे दूध दान केले!! हे महत्त्वाचे का आहे? फक्त १०० मिली दान केलेले दूध १ किलो वजनाच्या लहान बाळाला अनेक दिवस पुरू शकते. या दानामुळे एनआयसीयू (NICU) मधील डझनभर बाळांना संभाव्यतः आधार मिळू शकतो. दान करणे सुरक्षित, तपासणी केलेले आणि अत्यंत आवश्यक आहे.

वैद्यकीय गुंतागुंतीमुळे एनआयसीयू मधील अनेक बाळांना त्यांच्या आईचे स्वतःचे दूध लगेच मिळत नाही. दान केलेले दूध त्या सुरुवातीच्या महत्त्वाच्या दिवसांमध्ये प्रतिकारशक्ती आणि पोषण प्रदान करून एका महत्त्वाच्या पुलासारखे काम करते. ज्या मातांना तणाव, आजार, कुपोषण किंवा अकाली जन्मामुळे दूध येण्यास उशीर होतो, त्यांच्यासाठी हे एक पूल म्हणून काम करते. हे सिद्ध झाले आहे की दान केलेले मानवी दूध अकाली जन्मलेल्या बाळांमध्ये नेक्रोटायझिंग एंटेरोकोलायटिस (आतड्यांचा एक जीवघेणा आजार) होण्याची शक्यता लक्षणीयरीत्या कमी करते!!! तुम्ही कशी मदत करू शकता हे पाहण्यासाठी तुमच्या स्थानिक सरकारी रुग्णालयाशी संपर्क साधा!”

हेही वाचा- PBKS vs MI IPL 2026 : शेवटपर्यंत रंगला अटीतटीचा सामना; MI चा पंजाब किंग्सवर 6 गडी राखून विजय
यापूर्वी देखील ज्वाला गुट्टाने 30 लीटर ब्रेस्ट मिल्क दान केल आहे. एप्रिल २०२५ मध्ये मुलीला जन्म दिल्यानंतर भारतीय बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा हिने दररोज 600 मिलीलीटर दूध सरकारी रुग्णालयांमध्ये दान केले. 22 एप्रिल 2021 रोजी तिने अभिनेता विष्णू विनोदसोबत विवाह केला. लग्नाच्या चार वर्षानंतर ती आई बनली. ज्वालाने आपल्या मुलीला दूध पाजल्यानंतर सर्व दूध दान केले. त्यानंतर आता पुन्हा ही कामगिरी बजावत तिने सर्वांचे मन जिंकलं आहे. बॅडमिंटन कोर्टवर देशासाठी अनेक मेडल जिंकणारी ज्वाला आता लहान निरागस बाळांचे प्राण वाचवत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number