संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार समितीत भारताचा समावेश

संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार समितीत भारताचा समावेश झाला आहे, मानवाधिकार परिषदेच्या सदस्यत्वाच्या निवडणुक झाली यामध्ये भारताने विजय मिळवला आहे. आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील देशांमध्ये सर्वाधिक 188 मतांनी या समितीवर भारताची निवड करण्यात आली आहे. 1 जानेवारी 2019 पासून 3 वर्षासाठीचा हा कार्यकाळ राहणार आहे, ही निवडणूक गुप्त मतदानाने पार पडली आहे.  यामध्ये निवडून येण्यासाठी किमान 97 मतांची आवश्यकता होती, […]

संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार समितीत भारताचा समावेश

संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार समितीत भारताचा समावेश झाला आहे, मानवाधिकार परिषदेच्या सदस्यत्वाच्या निवडणुक झाली यामध्ये भारताने विजय मिळवला आहे.

आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील देशांमध्ये सर्वाधिक 188 मतांनी या समितीवर भारताची निवड करण्यात आली आहे.

1 जानेवारी 2019 पासून 3 वर्षासाठीचा हा कार्यकाळ राहणार आहे, ही निवडणूक गुप्त मतदानाने पार पडली आहे. 

यामध्ये निवडून येण्यासाठी किमान 97 मतांची आवश्यकता होती, संयुक्त राष्ट्राचे सदस्य असलेल्या 193 देशांनी या मतदानात भाग घेतला होता.

यापैकी 188 देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले आहे, आशिया-पॅसिफिक गटात भारताशिवाय बहरिन, बांगलादेश, फिजी आणि फिलिपाइन्स या देशांनीही  विजय मिळवला होता.

मात्र भारताचं पारडं आधीपासूनच जड होतं, यापूर्वी भारत 2011-14 आणि 2014-17 असा 2 वेळा मानवाधिकार परिषदेचा सदस्य राहिला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number