हैदराबाद : भारत बांगलादेश विरुद्धचे सर्व सामने जिंकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बांगलादेश विरुद्धच्या हैदराबादमधील वीस वीस षटकांच्या सामन्यात भारताने विक्रमी कामगिरी केली. संजू सॅमसनच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने वीस षटकांत सहा बाद २९७ धावा केल्या. ही वीस वीस षटकांच्या क्रिकेटमधली भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.
भारताने पावरप्लेमध्ये एक बाद ८२ धावा केल्या. ही भारताची पावरप्लेमधील सर्वोत्तम कामगिरी आहे. भारतीय संघाने ४३ चेंडूत १०० धावा केल्या. क्रिकेटमध्ये वीस वीस षटकांच्या प्रकारात भारताने १०० धावा करण्यासाठी पहिल्यांदाच एवढे कमी चेंडू घेतले आहेत. या सामन्यात भारताने पहिल्या दहा षटकांत एक बाद १५२ धावा केल्या. ही भारताची वीस वीस षटकांच्या प्रकारातील पहिल्या दहा षटकांमधील सर्वोत्तम कामगिरी आहे. भारताने ८४ चेंडूत २०० धावा केल्या. क्रिकेटमध्ये वीस वीस षटकांच्या प्रकारात भारताने २०० धावा करण्यासाठी पहिल्यांदाच एवढे कमी चेंडू घेतले आहेत. भारतीय फलंदाजांनी बांगलादेश विरुद्ध खेळताना २२ षटकार मारले. ही भारतीय फलंदाजांची वीस वीस षटकांच्या प्रकारातील एका डावातल्या षटकारांबाबतची सर्वोत्तम कामगिरी आहे.
भारत विरुद्ध बांगलादेश तिसरा वीस वीस षटकांचा सामना, हैदराबाद
भारताची फलंदाजी : सहा बाद २९७ धावा. संजू सॅमसन १११ धावा, अभिषेक शर्मा ४ धावा, सुर्यकुमार यादव ७५ धावा, रियान पराग ३४ धावा, हार्दिक पांड्या ४७ धावा, रिंकू सिंह नाबाद ८ धावा, नितीश रेड्डी शून्य धावा, वॉशिंग्टन सुंदर नाबाद १ धाव. अवांतर धावा १७.
बांगलादेशची गोलंदाजी : तंझीम हसन साकिब तीन बळी तर तस्किन अहमद, महमुदुल्ला, मुस्तफिझूर प्रत्येकी एक बळी.
संजू सॅमसनची अप्रतिम कामगिरी
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन याने ४७ चेंडूत १११ धावा केल्या. शतकी खेळी करणाऱ्या संजूने आठ षटकार आणि अकरा चौकार मारले. सुर्यकुमार यादवने ३५ चेंडूत ७५ धावा करताना पाच षटकार आणि आठ चौकार मारले. रियान परागने १३ चेंडूत ३४ धावा करताना चार षटकार आणि एक चौकार अशी फटकेबाजी केली. हार्दिक पांड्याने १८ चेंडूत ४७ धावा करताना प्रत्येकी चार षटकार आणि चौकार मारले. रिंकूने चार चेंडूत नाबाद आठ धावा करताना एक षटकार मारला.
A memorable evening Sanju Samson smashed the second fastest T20I century for #TeamIndia, off just 40 deliveries Live – https://t.co/ldfcwtHGSC#INDvBAN | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/UC7Iy1j6yY — BCCI (@BCCI) October 12, 2024
Innings Break! A batting exhibition from #TeamIndia as they post their Highest T20I total of all time India set a of 298 for Bangladesh as @IamSanjuSamson top-scores with 111(47) Over to our bowlers Scorecard – https://t.co/ldfcwtHGSC#INDvBAN |… pic.twitter.com/SHDG8omeIu — BCCI (@BCCI) October 12, 2024