India US LPG Deal : मोदी सरकारचा ट्रम्पसोबत मोठा करार, भारत आता अमेरिकेकडून एलपीजी खरेदी करणार

सोमवारी घोषणा केली की भारतीय सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनी पहिल्यांदाच अमेरिकेतून द्रवीभूत पेट्रोलियम गॅस (एलपीजी) आयात करण्यासाठी एक वर्षाचा करार केला आहे.

India US LPG Deal : मोदी सरकारचा ट्रम्पसोबत मोठा करार, भारत आता अमेरिकेकडून एलपीजी खरेदी करणार

भारत आणि अमेरिका यांच्यातील तणाव आता कमी होताना दिसून येत आहे. भारताने अमेरिकेसोबत एक मोठा करार केला आहे. भारत आता अमेरिकेकडून एलपीजी खरेदी करण्याची तयारी करत आहे.आमच्या चुलींमध्ये अमेरिकेचा गॅस वापरला जाईल, अशी घोषणा पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सोमवारी केली. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सोमवारी घोषणा केली की भारतीय सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनी पहिल्यांदाच अमेरिकेतून द्रवीभूत पेट्रोलियम गॅस (एलपीजी) आयात करण्यासाठी एक वर्षाचा करार केला आहे.

२०२६ पर्यंत दरवर्षी अंदाजे २.२ दशलक्ष टन एलपीजी आयात करण्यासाठी अमेरिकेसोबत करार करण्यात आला आहे. या करारानुसार, भारताच्या वार्षिक आयातीपैकी अंदाजे १०% आयात अमेरिकेतून होईल. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील एका पोस्टमध्ये पुरी यांनी लिहिले की, “एक ऐतिहासिक सुरुवात! जगातील सर्वात मोठ्या आणि वेगाने वाढणाऱ्या एलपीजी बाजारपेठांपैकी एक अमेरिकेत खुली झाली आहे”.

हेही वाचा – Saudi Arabia Accident: सौदीतील भीषण अपघातानंतर जयशंकर यांनी व्यक्त केले दुःख; म्हणाले ‘मन हेलावून टाकणारी घटना’

पुढे त्यांनी लिहिले की, “भारतातील लोकांना सुरक्षित आणि परवडणारा एलपीजी पुरवठा करण्याच्या आमच्या प्रयत्नात, आम्ही आमच्या एलपीजी पुरवठ्यात विविधता आणत आहोत. या कराराअंतर्गत आयात २०२६ मध्ये सुरू होईल”.  भारतातील सार्वजनिक तेल कंपन्यांनी आयातीसाठी अमेरिकन कंपन्यांसोबत हा करार केला आहे.पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप पुरी म्हणाले की, अमेरिकेने कर आकारणीच्या पार्श्वभूमीवर हा करार महत्त्वपूर्ण मानला जात आहे. यापूर्वी, व्यापार कराराचा भाग म्हणून अमेरिकेने भारतीय कृषी उत्पादनांवरचा आपला आग्रह सोडून दिल्याचे वृत्त समोर आले होते.

हेही वाचा – Saudi Arabia Accident: सौदी अरेबियात भीषण अपघात; मक्का ते मदीना जाणारी बस टँकरवर आदळली, 42 भारतीयांचा मृत्यू

भारतातील सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांमध्ये इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी संयुक्तपणे अमेरिकेसोबत हा एलपीजी करार केला आहे. एलपीजी हा तोच गॅस आहे जो स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरमध्ये भरला जातो. या करारानुसार, २०२६ पर्यंत अमेरिकेतून २.२ दशलक्ष टन एलपीजी आयात केले जाईल. हा करार फक्त एका वर्षासाठी आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number