जय महाराष्ट्र न्यूज, वेब टीम
जगातला पहिला वहिला स्पिनर मोबाईल भारतात लाँच झाला आहे. हाँगकाँगच्या चिल्ली इंटरनॅशनल होल्डिंग कंपनीने जगातला पहिला स्पिनर मोबाईल K188,AGPS आणि F05 भारतीय बाजारपेठेत आणला आहे.
हा फिचर फोन सप्टेंबर 2017 पासून अॅमेझॉन,फ्लिपकार्ट,शॉपक्लुझ व पेटीएमवरही उपलब्ध होणार आहे. या फिचर फोनची किंमत 1200 ते 1300 रुपयांपर्यंतच ठेवली आहे.
लवकरच हा फोन भारतातील काहूी प्रमुख स्टोअर्समध्येही उपलब्ध होईल. स्वस्तात मस्त अशा किंमतीत उपलब्ध असलेल्या या फिचर फोनचा वापर फिडगेट स्पिनरबरोबरच आपल्या स्मार्ट फोनचा ब्लूटूथ डिव्हाइस म्हणुनही करता येऊ शकतो.
नुकताच लाँच झालेला हा फोन साधारण फोन नसून हे फिडगेट स्पिनर, फिचर फोन आणि ब्लूटूथ हे एक अनोख कॉम्बिनेशन आहे.
तसंच या फोनमध्ये इमेज, व्हिडियो आणि इंटरनेट एक्सेसिबिलिटीबरोबरच म्यूजिक सपोर्टसाठी मल्टीमीडिया ऑप्शन्सदेखील दिलेले आहेत.
हे प्रोडक्ट भारतातील ऑनलाईन आणि ऑफलाईन स्टोर्सवर उपलब्ध आहे.
तसेच या फोनचे गोल्डन, सिल्वर, ब्लॅक, ब्लू आणि रेड असे एकुण 6 आकर्षक कलर ऑप्शनही उपलब्ध आहेत.