India-Nepal Relation: मोठी बातमी! अखेर भारताने नेपाळला कोंडीत पकडलं, ‘या’ महत्त्वाच्या पदार्थाच्या निर्यातीवर घातली बंदी

सीमावर्ती भागातील व्यापार जवळपास ठप्प झाला आहे. त्यानंतर बालेन शाह यांनी भारतामधून नेपाळमध्ये येणाऱ्या वाहनांवर देखील टोल लावला आहे.

India-Nepal Relation: मोठी बातमी!  अखेर भारताने नेपाळला कोंडीत पकडलं, ‘या’ महत्त्वाच्या पदार्थाच्या निर्यातीवर घातली बंदी

पंतप्रधान झाल्यानंतर बालेन शाहा यांनी पहिलाच मोठा निर्णय घेतला होता, ज्यामध्ये त्यांनी भारतामधून आयात होणाऱ्या वस्तुंवर शुल्क लावण्याची घोषणा केली. भारतामधून आयात होणाऱ्या 100 रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या प्रत्येक वस्तूवर नेपाळकडून आयात शुल्क लावण्यात आले. दरम्यान याचा मोठा फटका हा सीमावर्ती भागातील व्यापाराला बसला. सीमावर्ती भागातील व्यापार जवळपास ठप्प झाला आहे. त्यानंतर बालेन शाह यांनी भारतामधून नेपाळमध्ये येणाऱ्या वाहनांवर देखील टोल लावला आहे.

भारतामधून नेपाळमध्ये जाणाऱ्या वाहणांसदर्भात आता नेपाळ सरकारने आपलं धोरण अधिक कडक केलं आहे. जे वाहन नेपाळमध्ये जाणार आहेत, त्या वाहनाच्या चालकाला ओळख पत्र दाखवणं बंधनकारक करण्यात आलं आहे. एवढंच नाही तर बालेन शाहा यांनी लिपूलेखवर देखील दावा केला होता. त्यामुळे या सर्व निर्णयामधून बालेन शाहा यांची भारतविरोधी भूमिका समोर येत आहे.

हेही वाचा- Russian Oil Import : रशियन तेलाच्या मुदतीचे फक्त काही तास बाकी! अमेरिकेकडून सवलत न मिळाल्यास भारतात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा होणार? 

अशातच आता  भारताने नेपाळला मोठा धक्का दिला आहे. भारताने देशांतर्गत साखरेचे दर स्थिर ठेवण्यासाठी 30 सप्टेंबर पर्यंत पांढरी तसेच रिफाइंड साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. भारताच्या या निर्णयामुळे आता नेपाळ नव्या संकटात सापडला आहे. नेपाळ साखरेसाठी मोठ्या प्रमाणावर भारतावर अवलंबून आहे. सण उत्सवाच्या काळात नेपाळला मोठ्या प्रमाणात साखरेची गरज असते, त्यामुळे आता नेपाळमध्ये साखरेचा मोठा तुटवडा जाणवण्याची शक्यता असून, साखरेची किंमत चांगलीच भडकण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता बालेन शाहा सरकारने आवश्यक ती पाऊले उचलण्याची तयारी सुरू केली असल्याची देखील माहिती समोर येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number