मान्सून अंदमानात दाखल

अंदमान: नैऋत्य मौसमी वारे शुक्रवारी अंदमानात दाखल झाले आहेत. बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या चक्रीवादळामुळे वाऱ्यांची गती वाढणार असून मान्सूनची दाट शक्यता आहे. तर केरळमध्ये वेळेआधीच मान्सून दाखल होणार आहे. राज्यात रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या किनारपट्टी भागात शनिवारपासून मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज आहे. मंगळवारी पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, […]

मान्सून अंदमानात दाखल

अंदमान: नैऋत्य मौसमी वारे शुक्रवारी अंदमानात दाखल झाले आहेत. बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या चक्रीवादळामुळे वाऱ्यांची गती वाढणार असून मान्सूनची दाट शक्यता आहे. तर केरळमध्ये वेळेआधीच मान्सून दाखल होणार आहे.

राज्यात रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या किनारपट्टी भागात शनिवारपासून मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज आहे. मंगळवारी पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर येथे सोमवारी आणि मंगळवारी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच मुंबईमध्येदेखील ढगाळ वातावरणाची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number