India Israel Trade Deal: भारत-इस्रायलने गुपचूप साधला मोठा डाव; इकडे अमेरिका फक्त चर्चाच करत राहिली, तिकडे ‘रुपया’ने मारली बाजी

2026 मध्ये भारत - इस्रायल FTA होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, यामुळे दोन्ही देशांतील आर्थिक सहकार्याला नवे बळ मिळणार आहे.

India Israel Trade Deal: भारत-इस्रायलने गुपचूप साधला मोठा डाव; इकडे अमेरिका फक्त चर्चाच करत राहिली, तिकडे ‘रुपया’ने मारली बाजी

नवी दिल्ली: भारत – इस्रायल धोरणात्मक संबंध अधिक दृढ होत असतानाच दोन्ही देशांमधील मुक्त व्यापार करार (Free Trade Agreement , FTA) संदर्भातील चर्चा वेगाने पुढे सरकल्या आहेत. या पार्श्वभूमीवर इस्रायलमध्ये उपस्थिती असलेला एकमेव भारतीय बँकिंग संस्थान स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) भारतीय रुपयांमध्ये (INR) द्विपक्षीय व्यापार सुलभ करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलत आहे. 2026 मध्ये भारत – इस्रायल FTA होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, यामुळे दोन्ही देशांतील आर्थिक सहकार्याला नवे बळ मिळणार आहे.

एसबीआय इस्रायलचे सीईओ वी. मणिवन्नन यांच्या माहितीनुसार, भारताच्या प्रमुख भागीदार देशांसोबत रुपयांमध्ये व्यापार करण्याबाबत जागतिक स्तरावर रस वाढत आहे. याच अनुषंगाने भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने भारतीय बँकांना त्यांच्या कॉर्पोरेट ग्राहकांचा आयात – निर्यात व्यवहार भारतीय रुपयांत करण्यास परवानगी दिली आहे. या योजनेअंतर्गत इस्रायलला भागीदार देश म्हणून निवडण्यात आले असून, इस्रायली कंपन्या निर्यात – आयातीचे पेमेंट रुपयांत स्वीकारू व करू शकतील. हे व्यवहार Special Rupee Vostro Account (SRVA) च्या माध्यमातून पूर्ण केले जाणार आहेत.

तेल अवीवजवळील एसबीआय शाखेने या रुपया-आधारित व्यवहारांसाठी आवश्यक सर्व परवानग्या घेतल्या आहेत. यामुळे भारत – इस्रायल व्यापार अधिक सुलभ, जलद आणि डॉलरवरील अवलंबित्व कमी करणारा ठरणार आहे. विशेष म्हणजे, इस्रायल भारताला संरक्षण क्षेत्रातही प्रगत शस्त्रास्त्रे व तंत्रज्ञान पुरवत आहे. अलीकडेच इस्रायलने भारताला सूर्यास्त्र रॉकेट सिस्टिम देण्याचा निर्णय घेतला असून, संरक्षण सहकार्य अधिक बळकट झाले आहे.

हेही वाचा: Raj Thackeray: 'सभेसाठी शिवतीर्थावर या, तुमच्याशी भरभरुन बोलायचंय…'; राज ठाकरेंचे मनसैनिकांना आमंत्रण

दरम्यान, इस्रायलमध्ये 40,000 हून अधिक भारतीय कामगार कार्यरत झाल्याने एसबीआयने त्यांच्यासाठी भारतातील NRI खाते उघडण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. विशेषतः बांधकाम आणि कृषी क्षेत्रात कार्यरत भारतीय कामगारांसाठी रुपयांमध्ये थेट पैसे पाठवणे सोपे व्हावे, यासाठी ही सुविधा महत्त्वाची ठरत आहे. एसबीआयने 2007 मध्ये इस्रायलमध्ये आपली शाखा सुरू केली होती आणि आता ती भारत – इस्रायल आर्थिक संबंधांची कणा बनत चालली आहे.

राजकीय पातळीवरही हालचाली वेगात आहेत. वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या नोव्हेंबरमधील इस्रायल दौऱ्यानंतर, डिसेंबरमध्ये परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही इस्रायलला भेट दिली. याशिवाय इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधून लवकरच प्रत्यक्ष भेट घेण्यावर सहमती दर्शवली आहे.

भारत – इस्रायलFTA अद्याप अंतिम टप्प्यात नसला तरी, नोव्हेंबर 2025 मध्ये Terms of Reference (ToR) वर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर चर्चा पुन्हा अधिकृतपणे सुरू झाली आहे. 2026 च्या सुरुवातीला या चर्चांना गती देत व्यापक कराराकडे वाटचाल सुरू आहे. याशिवाय दोन्ही देशांनी द्विपक्षीय गुंतवणूक करार (Bilateral Investment Treaty, BIT) वरही स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यामुळे 2026 हे वर्ष भारत – इस्रायल आर्थिक, संरक्षणात्मक आणि धोरणात्मक भागीदारीसाठी निर्णायक ठरण्याची दाट शक्यता आहे.

हेही वाचा: Jiosphere Benefits: YouTube चं 'प्रीमियम' गुपित आलं बाहेर; फक्त हा ब्राउझर बदला आणि मिळवा जाहिरातींशिवाय व्हिडिओ पाहण्याचा आनंद

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number