Heron MK2 Drone: भारताचा मोठा संरक्षण करार; इस्रायलचे Heron MK 2 ड्रोन आता नौदलात दाखल

भारतीय वायुसेनेसाठी हवाई इंधनभरणी करणाऱ्या Flight Refuelling Aircraft खरेदीची प्रक्रिया देखील सुरू आहे. 8,000 कोटींच्या ‘Make in India’ निविदेमध्ये इस्रायलची IAI कंपनी एकमेव पात्र दावेदार ठरली आहे.

Heron MK2 Drone: भारताचा मोठा संरक्षण करार; इस्रायलचे Heron MK 2 ड्रोन आता नौदलात दाखल

नवी दिल्ली: भारताने संरक्षण क्षमता वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत इस्रायलसोबत Heron MK-2 या अत्याधुनिक ड्रोनच्या अतिरिक्त तुकडीसाठी आपत्कालीन तरतुदींनुसार करार केला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान या ड्रोनने उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर त्याच्या खरेदीची प्रक्रिया वेगाने करण्यात आली. भारतीय लष्कर आणि वायुसेनेकडे हे ड्रोन आधीपासून आहेत आणि आता नौदलातही त्यांचा समावेश होणार आहे.

इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीज (Israel Aerospace Industries, IAI) च्या अधिकाऱ्यांच्या मते, सप्टेंबर महिन्यात भारताच्या संरक्षण मंत्रालयाने 87 नवीन MALE (Medium Altitude Long Endurance) ड्रोनसाठी RFP (Request For Proposal) जारी केले होते. या प्रक्रियेत ‘Make in India’ कार्यक्रमाला केंद्रस्थानी ठेवण्यात आले असून भारत-इस्रायल संरक्षण सहकार्याला तीन दशकांची परंपरा आहे. Heron MK-2 ड्रोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे 35,000 फूट उंचीवर सलग 45 तास उड्डाण करण्याची क्षमता. जगभरातील 20 पेक्षा जास्त सैन्यदलांमध्ये या ड्रोनचा वापर केला जातो. इस्रायली हवाई दलही याच मॉडेलवर भरवसा ठेवते. त्यामुळे भारताच्या लष्करी ताफ्यात त्याचा समावेश ही क्षमता वाढवणारी मोठी पायरी मानली जात आहे.

हेही वाचा: Mumbai – Delhi AQI: मुंबईमधील प्रदूषण ‘सेफ झोन’कडे; दिल्ली अजूनही प्रदूषणाच्या विळख्यात

IAI ने स्पष्ट केले आहे की त्यांचे उद्दिष्ट केवळ हे ड्रोन भारताला पुरविण्यापुरते मर्यादित नाही. भारतातच यांचे उत्पादन करण्याचा त्यांचा व्यापक आराखडा आहे. ‘Make in India’ उपक्रमानुसार या ड्रोनचे भारतीय संस्करण (Indian Variant) तयार करण्यासाठी 60 टक्क्यांपेक्षा जास्त भारतीय घटकांचा वापर केला जाणार आहे, तसेच टेक्नॉलॉजी ट्रान्सफरद्वारे स्थानिक उत्पादन क्षमतेला चालना दिली जाईल.

दरम्यान, भारतीय वायुसेनेसाठी हवाई इंधनभरणी करणाऱ्या Flight Refuelling Aircraft खरेदीची प्रक्रिया देखील सुरू आहे. 8,000 कोटींच्या ‘Make in India’ निविदेमध्ये इस्रायलची IAI कंपनी एकमेव पात्र दावेदार ठरली आहे. या प्रकल्पात किमान 30 टक्के भारतीय सामग्रीचा वापर आवश्यक आहे. रशियन आणि काही युरोपीय कंपन्यांनीही या स्पर्धेत सहभाग घेतला होता; मात्र त्या निर्धारित अटी पूर्ण करू शकल्या नाहीत.

सूत्रांच्या मते, करार अंतिम झाल्यास IAI सहा जुनी Boeing-767 व्यावसायिक विमाने मॉडिफाय करून त्यांना टँकर विमानांमध्ये बदलणार आहे. सध्या वायुसेनेकडे रशियन बनावटीच्या IL-78 रिफ्यूलिंग विमानांची तुकडी आहे, परंतु गेल्या 15 वर्षांत नवीन टँकर विमान खरेदीचे प्रयत्न वारंवार अयशस्वी ठरले होते. या सर्व घडामोडी भारताच्या संरक्षण आधुनिकीकरणाला गती देणाऱ्या ओघात महत्त्वपूर्ण टप्पे म्हणून पाहिल्या जात आहेत. तज्ज्ञांच्या मते, ड्रोन ताफ्याची वाढ आणि रिफ्यूलिंग विमानांची खरेदी यामुळे भारताची हवाई आणि सामरिक ताकद आणखी मजबूत होणार आहे.

हेही वाचा: Smriti Mandhana-Palash Muchhal Wedding: स्मृती आणि पालाशचं लग्न 7 डिसेंबरला होणार? स्मृतीच्या भावाने सांगितलं सत्य

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number