देशभरातील साहित्यिक अधिकाऱ्यांना मिळणार व्यासपीठ; दिल्लीत होणार महिला अधिकाऱ्यांचं पहिलं मराठी साहित्य संमेलन रंगणार

दोन दिवसांचा हा कार्यक्रम असून कोणत्याही साहित्य संमेलनामध्ये असतात तसे बरेचसे कार्यक्रम या संमेलनात आहेत. 

देशभरातील साहित्यिक अधिकाऱ्यांना मिळणार व्यासपीठ; दिल्लीत होणार महिला अधिकाऱ्यांचं पहिलं मराठी साहित्य संमेलन रंगणार

 दिल्लीमध्ये प्रथमच प्रशासकीय महिला अधिकाऱ्यांचं मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात येत आहे. या संमेलनामुळे देशभरातील साहित्यिक असलेल्या महिला अधिकाऱ्यांना एकत्र येण्याचं आणि आपले विचार मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.दोन दिवसांचा हा कार्यक्रम असून कोणत्याही साहित्य संमेलनामध्ये असतात तसे बरेचसे कार्यक्रम या संमेलनात आहेत. 

या संमेलनाची सुरुवात ग्रंथ दिंडीनं होणार आहे, त्यानंतर अधिकाऱ्यांच्या मुलाखती, कवी संमेलन, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा यांचं आयोजन करण्यात आलं आहे. हे व्यासपीठ महिला अधिकाऱ्यांसाठी महत्त्वाचं असून, वेगळ्या प्रकारचे अनुभव त्यांच्या साहित्यनिर्मितीत दिसून येतात. 

हेही वाचा – Ravindra Jadeja: हार्दिक पांड्यानंतर आता रवींद्र जडेजाचा जलवा; टी20 क्रिकेटमध्ये रचला असा विक्रम जो जगात फक्त काही जणांनाच जमला 

दिल्लीत होणारं महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांचं साहित्य संमेलन :महिला शासकीय अधिकाऱ्यांचं साहित्य संमेलन दिल्लीत होऊ घातलं असून, स्वागताध्यक्ष सुप्रिया देवस्थळी यांनी सांगितलं की "महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांचं होणारं हे पहिलं असं साहित्य संमेलन असल्यामुळे महाराष्ट्राच्या वाङ्मयमय इतिहासामधील ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट ठरणार आहे

हेही वाचा – Monalisa Bhosale: 'व्हायरल गर्ल' मोनालिसाचा विवाह वादाच्या भोवऱ्यात; आयोगाच्या चौकशीत समोर आली धक्कादायक माहिती

या माध्यमातून महिलांना एकमेकांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. मराठी वाङ्मयामध्ये भविष्यात अधिक चांगल्या घडामोडी घडण्याची ही सुरुवात ठरू शकते. या संमेलनाला महाराष्ट्र राज्य, दिल्ली केंद्र शासन आणि इतर राज्यांमधील कार्यरत महिला अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून विविध स्तरांवरील अनुभवांमुळे संमेलन अधिक समृद्ध होणार आहे.

हे संमेलन महिला अधिकाऱ्यांच्या विचारविश्वाला दिशा देणारं आणि त्यांच्या अनुभवांना समाजासमोर आणणारं एक महत्त्वाचा मंच ठरणार आहे. भविष्यात हे संमेलन दरवर्षी आयोजित करण्याचाही विचार आहे. या उपक्रमामुळे मराठी साहित्याला एक नवीन आयाम मिळणार असून, प्रशासनात कार्यरत महिलांच्या सर्जनशील योगदानाची देशपातळीवर दखल घेतली जाणार आहे, असं लेशपाल यांनी स्पष्ट केलं.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number