Petrol Diesel Rate Update: केंद्र सरकारचा इंधनावरील कराबाबत मोठा निर्णय; 1 मे पासून डिझेल निर्यातीवरील कर घटवला, पाहा काय आहेत नवे दर

केंद्र सरकारने डिझेल आणि एटीएफवरील विंडफॉल टॅक्समध्ये मोठी कपात करत नवीन दर 1 मेपासून लागू केले आहेत.

Petrol Diesel Rate Update: केंद्र सरकारचा इंधनावरील कराबाबत मोठा निर्णय; 1 मे पासून डिझेल निर्यातीवरील कर घटवला, पाहा काय आहेत नवे दर

नवी दिल्ली: केंद्र सरकारने 1 मे 2026 पासून इंधन निर्यातीवरील विंडफॉल टॅक्समध्ये मोठा दिलासा दिला आहे. डिझेलच्या निर्यातीवर आकारला जाणारा अतिरिक्त कर आता कमी करून 23 रुपये प्रति लिटर करण्यात आला आहे. तसेच विमानांमध्ये वापरल्या जाणाऱ्या एटीएफ (एव्हिएशन टर्बाइन फ्यूल) वरील करही कमी करून 33 रुपये प्रति लिटर करण्यात आला आहे. अर्थ मंत्रालयाने गुरुवारी (30 एप्रिल 2026) उशिरा जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली.

मंत्रालयाच्या माहितीनुसार, पेट्रोलच्या निर्यातीवरील कर अद्याप शून्यच ठेवण्यात आला आहे. तसेच देशांतर्गत वापरासाठी असलेल्या पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यापूर्वी डिझेलच्या निर्यातीवर 55.5 रुपये प्रति लिटर इतका अतिरिक्त कर आकारला जात होता, तो आता मोठ्या प्रमाणात घटवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे एटीएफवरील कर 42 रुपयांवरून कमी करून 33 रुपये करण्यात आला आहे.

1 मेपासून लागू होणाऱ्या पुढील 15 दिवसांच्या कालावधीसाठी डिझेलच्या निर्यातीवर रस्ता व पायाभूत विकासासाठी लावण्यात येणारा सेस शून्य ठेवण्यात आला आहे. याआधी 26 मार्च रोजी सरकारने डिझेलवर 21.50 रुपये आणि एटीएफवर 29.5 रुपये प्रति लिटर निर्यात कर लावला होता. त्यानंतर 11 एप्रिलच्या आढाव्यात हे दर वाढवून अनुक्रमे 55.5 रुपये आणि 42 रुपये करण्यात आले होते.

हेही वाचा: Weather Update : महिन्याच्या सुरवातीलाच राज्यावर दुहेरी संकट! एकीकडे उन्हाने होरपळून काढलं, तर ‘या’ जिल्ह्यांना अवकाळीचा अलर्ट जारी

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत इंधन पुरवठा कायम राहावा, यासाठी सरकारने हे कर लागू केले होते. जागतिक बाजारातील किंमतीतील फरकाचा गैरफायदा निर्यातदार कंपन्यांनी घेऊ नये, हा यामागील मुख्य उद्देश होता. युद्ध सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली होती.

28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवर लष्करी कारवाई केल्यानंतर परिस्थिती अधिक चिघळली. त्यानंतर इराणनेही प्रत्युत्तर दिल्याने कच्च्या तेलाच्या किंमती झपाट्याने वाढून सुमारे 126 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचल्या होत्या. याआधी या किंमती सुमारे 73 डॉलर प्रति बॅरल होत्या. पश्चिम आशियातील तणाव लक्षात घेता देशांतर्गत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी निर्यात कमी करण्याच्या उद्देशाने हा कर लागू करण्यात आला होता.

दरम्यान, प्रमुख शहरांमधील इंधन दर स्थिर असून मुंबईत पेट्रोल 103.54 रुपये प्रति लिटर तर डिझेल 90.03 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. नवी दिल्लीत पेट्रोल 94.77 रुपये आणि डिझेल 87.67 रुपये प्रति लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 105.41 रुपये तर डिझेल 92.02 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 100.80 रुपये आणि डिझेल 92.39 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. बंगळुरूमध्ये पेट्रोल 102.92 रुपये आणि डिझेल 90.99 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे.

कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये पुन्हा वाढ होत असल्याचे चित्र आहे. पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे ब्रेंट क्रूडच्या किंमतीत 1.2 टक्क्यांनी वाढ होऊन दर 111.70 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचले आहेत. काल हे दर 126.41 डॉलर या चार वर्षांतील उच्चांकी पातळीवर गेले होते. तर अमेरिकन कच्च्या तेलाचा दर सध्या 105.64 डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत आहे.  

हेही वाचा: Ravi Rana: "एकनाथ शिंदेंनी मला ऑफर दिली होती, पण…" आमदार रवी राणांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number