वृत्तसंस्था, नवी दिल्ली
जपानचे पंतप्रधान शिंजो आबे बुधवारपासून भारत दौऱ्यावर असणार आहेत. या दरम्यान ते गुजरातमध्ये राहणार आहेत. यावेळी जपानचे पंतप्रधान आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भव्य रोड शो करणार आहेत.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिंजो आबे यांच्या हस्ते गुरुवारी होणार आहे.
आबे यांच्या स्वागतासाठी अहमदाबाद शहर विविध रंगांच्या रोषणाईने रंगविण्यात आले आहे. मोदी आणि आबे यांच्या रोड शो दरम्यान भारतीय संस्कृतीची विविधता दाखविण्यात येणार आहे.