अपक्षांवर ईडी, सीबीआयकडून दबाव – संजय राऊत

राज्यसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारण चांगलच तापलं आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी जागा सहा आणि उमेदवार सात आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले असून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना भाजपवर टीका केली आहे. तसेच सहाव्या जागेसाठी भाजपाकडून अपक्ष आमदारांवर दबाव आणला जात असल्याचा आरोपही राऊतांनी केला आहे. अपक्ष आमदारांवर भाजपकडून […]

अपक्षांवर ईडी, सीबीआयकडून दबाव – संजय राऊत

राज्यसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारण चांगलच तापलं आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी जागा सहा आणि उमेदवार सात आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले असून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना भाजपवर टीका केली आहे. तसेच सहाव्या जागेसाठी भाजपाकडून अपक्ष आमदारांवर दबाव आणला जात असल्याचा आरोपही राऊतांनी केला आहे.

अपक्ष आमदारांवर भाजपकडून ईडी-सीबीआयच्या माध्यमातून दबाव आणला जात आहे. तसेच अपक्ष फोडण्यासाठी ईडी, सीबीआयचा वापर होत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. राऊत म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेवर आहे. त्यामुळे आम्ही ताकदीने नवडणुकीच्या मैदानात उतरलो आहोत. प्रश्न राज्यसभेच्या सहाव्य जागेचा आहे. त्यासाठी भाजपा अपक्ष किंवा इतर पक्षांवर अवलंबून आहे. म्हणजे भाजप अपक्षांना आमिष दाखवून त्यांच्यावर ईडी, सीबाआयकडून दबाव आणणार. ईडी, तसेच काही जुनी प्रकरणं उकरून काढून त्यांना त्रास देण्याच्या भूमिकेत भाजप आहे, असे संजय राऊत म्हणाले. तसेच यातून भाजपाचे चरित्र दिसत असल्याचेही राऊत म्हणाले.

तसेच, गेल्या ५० वर्षांपासून आम्ही निवडणूका लढवत आहोत. निवडणुकांचा सर्वात जास्त अनुभव आम्हाला आहे. आमच्या हाती ईडी, सीबीआय नाही, परंतु इतर अनेक गोष्टी आमच्या हाती आहेत हे लक्षात ठेवा, असेही संजय राऊत म्हणाले.

येत्या १० जून रोजी राज्यसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे कोणते अपक्ष आमदार कुणाच्या बाजूने आहेत हे निवडणुकीच्या दिवशी कळेल, असे संजय राऊत म्हणाले.

  • राज्यसभेसाठी कोण आहेत उमेदवार?

पीयूष गोयल विद्यमान केंद्रीय मंत्री आणि नेता, भाजपा
डॉ. अनिल बोंडे, माजी कृषीमंत्री आणि नेता, भाजपा
धनंजय महाडिक, नेता, भाजपा


संजय राऊत, संसदीय गटनेता, शिवसेना
संजय पवार, जिल्हाप्रमुख, कोल्हापूर (ग्रामीण)


प्रफुल्ल पटेल, नेता राष्ट्रवादी आणि माजी केंद्रीय मंत्री


इम्रान प्रतापगढी अध्यक्ष, अल्पसंख्याक विभाग, काँग्रेस


Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number