IND vs AFG: पहिल्या वनडेत भारताचा 7 गडी राखून विजय; शुभमन गिलची नाबाद ८४ धावांची शानदार खेळी

हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन (HPCA) स्टेडियमवर खेळला गेला.भारतीय संघाने या सामन्यात ७ गडी राखून दणदणीत विजय मिळवला.

IND vs AFG: पहिल्या वनडेत भारताचा 7 गडी राखून विजय; शुभमन गिलची नाबाद ८४ धावांची शानदार खेळी

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना शनिवारी (१३ जून) धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन (HPCA) स्टेडियमवर खेळला गेला.भारतीय संघाने या सामन्यात ७ गडी राखून दणदणीत विजय मिळवला.

या सामन्यात अफगाणिस्तानने भारतीय संघासमोर १९५ धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे भारताने १३ चेंडू शिल्लक असतानाच गाठले. नाबाद ८४ धावांची खेळी करणारा कर्णधार शुभमन गिल भारताच्या या विजयाचा नायक ठरला. पावसामुळे सामन्यातील षटकांची संख्या कमी करून ती प्रत्येक बाजूसाठी २५ करण्यात आली होती. या दोन संघांमधील पुढील सामना १७ जून रोजी लखनौ येथे खेळला जाईल.

भारतीय संघ हार्दिक पांड्या आणि विराट कोहली यांच्याशिवाय या एकदिवसीय मालिकेत उतरला आहे. मात्र, आनंदाची बाब म्हणजे रोहित शर्मा पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि संघासाठी त्याचा अनुभव अत्यंत महत्त्वाचा आहे. अफगाणिस्तानच्या संघात रशीद खान आणि मोहम्मद नबी यांसारखे अनुभवी खेळाडू आहेत, जे सामन्याचे पारडे फिरवण्यात माहिर आहेत.

लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी केली. दुर्दैवाने रोहित 'रन आऊट' झाला; त्याने १६ चेंडूंत १६ धावा केल्या, ज्यामध्ये दोन चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. त्यानंतर, शुभमन गिल आणि ईशान किशन यांनी ७० धावांची भागीदारी करून भारताला मजबूत स्थितीत आणले. ईशान ३४ धावांवर असताना रशीद खानचा बळी ठरला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number