मातोश्रीबाहेर सुरक्षेत वाढ

आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा मुंबईत मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करणार आहेत. त्यानुसार ते आज मुंबईत दाखल झाले आहेत. मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याच्या राणा दाम्पत्यांच्या निर्णयावर मुंबईत राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसैनिक आक्रमक झाले असून मातोश्रीबाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. राणा दाम्पत्यांना रोखण्यासाठी शिवसैनिकांनी वांद्रे परिसरात वांद्रे परिसरात शिवसैनिकांनी […]

मातोश्रीबाहेर सुरक्षेत वाढ

आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा मुंबईत मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करणार आहेत. त्यानुसार ते आज मुंबईत दाखल झाले आहेत. मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याच्या राणा दाम्पत्यांच्या निर्णयावर मुंबईत राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसैनिक आक्रमक झाले असून मातोश्रीबाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

राणा दाम्पत्यांना रोखण्यासाठी शिवसैनिकांनी वांद्रे परिसरात वांद्रे परिसरात शिवसैनिकांनी नवनीत राणा यांना आव्हान देणारे बॅनर्स लावले आहेत. नवनीत राणा यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी वांद्रे परिसरात पाऊल ठेऊनच दाखवावे. शिवसैनिक सज्ज आहेत, असे बॅनर्स शिवसैनिकांकडून लावण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर ‘मातोश्री’ बाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी मध्यरात्री मातोश्रीच्या समोरील रस्त्यावर दोन्ही बाजूंनी बॅरिकेडिंग केलं आहे.

दरम्यान, कोणत्याही परिस्थितीत आम्ही मातोश्रीवर जाणार, आपल्याला कोणीही अडवू शकत नाहीत, अशी प्रतिक्रिया खासदार नवनीत राणा यांनी दिली आहे.

राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाले असून त्यांचा मुक्काम विमानतळाशेजारी असणाऱ्या नंदगिरी गेस्टहाऊसवर असणार आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी मोर्चा नंदगिरी गेस्टहाऊसवर वळवला असून शिवसैनिकांनी गेस्टहाऊसला घेराव घातला आहे. तसेच यावेळी शिवसैनिकांकडून राणा दाम्पत्य यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number