भारतात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वरती काढल्याचे चित्र दिसत आहे . कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. मागील २४ तासात देशात १२ हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्याआधीच्या दिवसाशी तुलना करता कोरोनाबाधितांच्या संख्येत चार हजारांनी वाढ झाली आहे. याचा अर्थ आदल्या दिवशीच्या तुलनेत कोरोनाबाधितांच्या संख्येत ३८.४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
सध्या देशात 58 हजारांहून अधिक कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. तर, मागील २४ तासात ११ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसानं पासून कोरोना रुग्ण संख्येत घट झाल्याचे आपण पहिले होते कोरोना कमी झाल्याने भारतातील परिस्थिती पूर्व पदावर आली होती मात्र आता. कोरोना संख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे.तर भारतात १२ हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. एकाच दिवसात कोरोनाबाधितांच्या संख्येत ३८ टक्क्यांनी वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे.