देशात कोरोनानं धरला वेग

देशात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. देशात 4 हजार 435 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, राजधानी दिल्लीत एका दिवसांत कोरोना रुग्णांचा सक्रीय दर 10.9 टक्क्यांनी वाढला आहे. महाराष्ट्रात बुधवारी कोरोनाबाधितांची संख्या 569वर पोहचली आहे. देशात कोरोना विषाणुमुळे पुन्हा धाकधूक वाढली आहे. मागील काही […]

देशात कोरोनानं धरला वेग

देशात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. देशात 4 हजार 435 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, राजधानी दिल्लीत एका दिवसांत कोरोना रुग्णांचा सक्रीय दर 10.9 टक्क्यांनी वाढला आहे. महाराष्ट्रात बुधवारी कोरोनाबाधितांची संख्या 569वर पोहचली आहे.

देशात कोरोना विषाणुमुळे पुन्हा धाकधूक वाढली आहे. मागील काही महिन्यांमध्ये कोरोनाचा आलेख घसरला होता, मात्र, पुन्हा देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. आरोग्य मंत्रालयाने बुधवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात 4,435 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर 569 सक्रीय रुग्ण आढळले आहेत. एका दिवसापूर्वी राज्यात 711 सक्रीय रुग्ण आढळले आहेत.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. गर्दीच्या ठिकाणी टाळणे आणि मास्क वापरण्याचे निर्देश आयोगाने केले आहे. तसेच सामाजिक अंतराची अट पाळण्याचे आवाहन आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आले आहे. तर, नागरिकांनी न घाबरण्याचा सल्लाही आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number