जळगाव : थंडीची चाहूल लागल्याने वातावरणात गारवा जाणवायला लागला आहे हा गारवा क्षणिक काळासाठी आनंद देतोय पण याउलट चोपडा तालुक्यात हिवाळ्याच्या सुरुवातीलाच झालेल्या वातावरण बदलीमुळे रुग्णसंखेत वाढ झाली आहे. बाहेरगावी जाऊन येणारे आणि दूषित पाणी-आहार सेवन करणारे रुग्ण कावीळचे शिकार बनत आहेत. परिणामी, चोपडा उपजिल्हा रुग्णालयात कावीळचे रुग्णांचे प्रमाण लक्षात घेता, रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
दररोज चोपडा उपजिल्हा रुग्णालयात पाचशेहून अधिक रुग्णांची तपासणी केली जात आहे. रुग्णसंख्येतील या वाढीचे कारण वातावरणातील बदल, दूषित पाणी व अन्नपदार्थ असल्याचे सांगितले जात आहे. उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक, डॉक्टर सुरेश पाटील यांनी याबाबत माहिती दिली.
सतत वाढत असलेली रुग्णसंख्या आणि कावीळसारख्या रोगांचे प्रकोप लक्षात घेत रुग्णालय प्रशासन अधिक सजगतेने काम करत आहे. डॉक्टर पाटील यांच्या म्हणण्यानुसार, "अशा परिस्थितीत नागरिकांनी स्वच्छतेची काळजी घेत, पाणी आणि आहाराचे सेवन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे."
कावीळ (ज्याला जॉन्डिस किंवा पिवळेपण म्हणतात) झाल्यावर काही महत्वाच्या गोष्टींवर लक्ष देणे आवश्यक आहे:
आहार:
>जास्त तेलकट, तळलेले आणि मसालेदार पदार्थ टाळा.
>हिरव्या पालेभाजी आणि फळांचे सेवन करा, ज्यामुळे लिव्हरला पोषण मिळते.
>पाणी जास्त प्या, यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते.
>मांसाहार, अल्कोहोल, आणि गोड पदार्थ कमी करा.
आराम: शरीराला पूर्ण विश्रांती देणे अत्यंत आवश्यक आहे. जास्त शारीरिक कष्ट आणि ताण यामुळे शरीराची स्थिती अजून वाईट होऊ शकते.
औषधांचे वेळेवर सेवन: डॉक्टरांच्या सांगण्यानुसार औषधे घ्या. स्वतःचे उपचार किंवा औषधे घेणं टाळा.
वजन आणि शरीराची स्थिती पाहा: शरीरातील पाणी संतुलन राखा, वजनाच्या वाढीवर लक्ष ठेवा.
जास्त पिवळेपण किंवा इतर लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण हे लिव्हरच्या गंभीर समस्येचे संकेत असू शकतात.