मुंबई, १५ मे २०२३, प्रतिनिधी : बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वातून घराघरात पोहोचलेले गायक दादूस अर्थात संतोष चौधरी हे प्रामुख्याने आगरी कोळी गाणी गाण्यासाठी ओळखले जातात. आता ते पुन्हा एकदा चर्चेत आलेत. एका हळदीच्या कार्यक्रमात गोळीबार करतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झालाय त्यामुळे ते सध्या बरेच चर्चेत आहेत.
बिग बॉसमधून प्रेक्षकांची मनं जिंकणारे दादूस अलीकडेच मुंबईतील शिवडी येथील एका हळदीच्या कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी त्यांनी हवेत गोळीबार केल्याचं समोर आलं आहे. ते वादक आणि संगीतकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या सचिन भांगरे याच्या हळदीत सहभागी झाले होते. यावेळी गाणं गात असताना त्यांनी अचानक खिशातून आपली बंदूक काढून हवेत गोळीबार केला..आता हा त्यांचा व्हिडिओ समजून माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ पाहताच मुंबई पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. पुढील चौकशीसाठी पोलिस दादुस म्हणजेच संतोष चौधरी यांना पोलिस ठाण्यात बोलवण्यात येईल असा अंदाज वर्तवला जात आहे.