निसर्गात होत असणाऱ्या बदलांचा परिणाम मानवी आरोग्यावर नक्कीच होत असतो. मालेगावात सुरू असलेला उन्हाचा तडाखा आणि प्रदूषित पाणी, अस्वच्छता यामुळे गॅस्ट्रो, डायरीयाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून मालेगावातील एकट्या हारून अन्सारी रुग्णालयात गेल्या आठ दिवसात १५० पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इतर रुग्णालयातील आकडेवारी पाहता मोठ्या प्रमाणावर रुग्ण […]
निसर्गात होत असणाऱ्या बदलांचा परिणाम मानवी आरोग्यावर नक्कीच होत असतो. मालेगावात सुरू असलेला उन्हाचा तडाखा आणि प्रदूषित पाणी, अस्वच्छता यामुळे गॅस्ट्रो, डायरीयाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून मालेगावातील एकट्या हारून अन्सारी रुग्णालयात गेल्या आठ दिवसात १५० पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इतर रुग्णालयातील आकडेवारी पाहता मोठ्या प्रमाणावर रुग्ण संख्येत वाढ झाली असून ही वाढ मालेगावकरांच्या चिंतेत भर टाकणारी आहे.