अमरावतीत एसटी संपामुळे विध्यार्थ्यांची गैरसोय

एसटी महामंडळ राज्य शासनामध्ये विलिनीकरण्याच्या मागणीसाठी राज्यात ठिकठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान राज्य सरकारने कर्मचाऱ्यांचे वेतनवाढ करण्याचा निर्णय घेतला. तरीही कर्मचारी विलिनीकरणाच्या भूमिकेवर ठाम असून कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. अमरावतीमध्ये महिन्याभरापासून कर्मचाऱ्यांचे एसटी आंदोलन सुरू आहे त्यामुळे प्रवाशांसह विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. अमरावतीमध्ये एसटी संपकारी कर्मचाऱ्यांचा संप संपलेला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी […]

अमरावतीत एसटी संपामुळे विध्यार्थ्यांची गैरसोय

एसटी महामंडळ राज्य शासनामध्ये विलिनीकरण्याच्या मागणीसाठी राज्यात ठिकठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान राज्य सरकारने कर्मचाऱ्यांचे वेतनवाढ करण्याचा निर्णय घेतला. तरीही कर्मचारी विलिनीकरणाच्या भूमिकेवर ठाम असून कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. अमरावतीमध्ये महिन्याभरापासून कर्मचाऱ्यांचे एसटी आंदोलन सुरू आहे त्यामुळे प्रवाशांसह विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

अमरावतीमध्ये एसटी संपकारी कर्मचाऱ्यांचा संप संपलेला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी एसटी रस्त्यावर धावत नाही आहे. अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची बसेस बंद असल्याने मोठी गैरसोय होती आहे. जास्त पैसे मोजून विद्यार्थ्यांना खाजगी वाहनातून शाळा गाठावी लागते आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून एसटी बससेवा बंद असल्यामुळे प्रवाशांसह विद्यार्थ्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. विद्यार्थ्यांना प्रवास करण्यासाठी जास्तीचे पैसै मोजावे लागत आहे. तर काही विद्यार्थ्यांना पायपीट करत शाळेत जावे लागत आहे. त्यामुळे मोठी विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number