जय महाराष्ट्र न्यूज, धुळे
धुळे शहरात राष्ट्रवादी चे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, तसेच काँग्रेस विधान परिषदचे सदस्य अमरीश पटेल यांच्या शिरपूर येथील निवासस्थानी आयकर विभागाने कारवाई केली आहे.
एका उदयोग क्षेत्रात असलेल्या भागीदारी प्रकरणी आयकर विभागाकडून त्या उद्योग क्षेत्रात असलेल्या भागीदारांची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळाली.
दोन्ही ठिकाणी सुरू असलेल्या चौकशी पथकात साधारण 25 पेक्षा अधिक सदस्य आहेत. धुळे जिल्ह्यात एकाच वेळी ही कारवाई झाल्यानं राजकीय, उद्योग क्षेत्रात खळबळ माजली आहे.