कोल्हापूरमध्ये पावसाची संततधार

मुंबई, २१ जुलै २०२३, प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड, चंदगड तालुक्यांत मुसळधार पाऊस होत आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने पंचगंगेच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यात आगामी दोन दिवस ऑरेंज अलर्ट असून, पावसाचा जोर कायम राहील, असा हवामान विभागाचा […]

कोल्हापूरमध्ये पावसाची संततधार

मुंबई, २१ जुलै २०२३, प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड, चंदगड तालुक्यांत मुसळधार पाऊस होत आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने पंचगंगेच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यात आगामी दोन दिवस ऑरेंज अलर्ट असून, पावसाचा जोर कायम राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी पावसाचा जोर कमी होता मात्र पावसाची रिपरिप सुरुच असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. जिल्ह्यातील तब्बल ५८ बंधारे पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला असून वाहतूकही विस्कळीत झाली आहे. कृष्णा-पंचगंगेच्या संगम स्थळावर असलेल्या नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात पाणी शिरले आहे.

राधानगरी धरण ६० टक्के भरल्याने बुधवारी दिवसभरात वीज निर्मितीसाठी सोडण्यात येणारा विसर्ग वाढविला आहे. त्यामुळे ‘भोगावती’, ‘कुंभी’, ‘कासारी’सह जिल्ह्यातील सर्वच नद्यांचे पाणी सकाळी पात्राबाहेर आले. पंचगंगेची पातळी सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत तब्बल ५ फुटाने वाढली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number