अल्लू अर्जुनच्या नव्या चित्रपटगृहाचे उदघाटन

मुंबई, १५ जून २०२३ , प्रतिनिधी : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन याच्या नव्या चित्रपटगृहाचे आज अहमदाबाद येथे उदघाटन झाले. या चित्रपटगृहाच्या नाव AAA असे आहे. अल्लू अर्जुनने आशियाई सिनेमाच्या सहयोगाने हे नवे चित्रपटगृह उभारले आहे. यावेळी अल्लू अर्जुनाची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. १५ जूनला अभिनेता अल्लू अर्जुनच्या या व्हिडिओमध्ये अभिनेता त्याच्या कारमधून […]

अल्लू अर्जुनच्या नव्या चित्रपटगृहाचे  उदघाटन

मुंबई, १५ जून २०२३ , प्रतिनिधी : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन याच्या नव्या चित्रपटगृहाचे आज अहमदाबाद येथे उदघाटन झाले. या चित्रपटगृहाच्या नाव AAA असे आहे. अल्लू अर्जुनने आशियाई सिनेमाच्या सहयोगाने हे नवे चित्रपटगृह उभारले आहे. यावेळी अल्लू अर्जुनाची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती.

१५ जूनला अभिनेता अल्लू अर्जुनच्या या व्हिडिओमध्ये अभिनेता त्याच्या कारमधून बाहेर येताना दिसत आहे. त्यानंतर तो हात जोडून चाहत्यांना अभिवादन करताना दिसतो. यावेळी अल्लूने क्रीम टी-शर्टसोबत तपकिरी रंगाचा सूट घातला आहे.

अल्लू अर्जुन हा मूळ दाक्षिणात्य अभिनेता असला तरीही पुष्प या चित्रपटातून त्याने आपली नवी ओळख निर्माण केली. त्यांचे फक्त भारतातच नाही तर जगभरात अनेक चाहते आहेत

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number