अमरावती आज 15 जुलै रोजी थरारक घटना उघडकीस आली. अमरावती शहरातील राजेंद्र नगर परिसरात थेट हाताचा पंजा छाटण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजेंद्र नगर येथे एका युवकाचा तीन ते चार युवकांनी हाताचा पंजा पूर्णपणे छाटून टाकला. यानंतर जखमी युवकाला अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान जखमी युवकाचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितनुसार, ताज नगर येथील रहिवासी शेख अफाख शेख अकिल वय 24 वर्ष या तरुणाचा तीन ते चार आरोपी तरुणांसोबत प्रेम प्रकरणातून काही दिवसापासून वाद सुरू होता, या वादातूनच आज सकाळी अमरावतीच्या राजेंद्र कॉलनीत शेख अफाख या तरुणावर चाकूने हल्ला केला. इतकचं नव्हे तर हल्ली खोरांनी त्या तरुणाचा पंजा हाता वेगळा केला तो कित्येक वेळ घटनास्थळीच पडून होता. वाद मिटवण्यासाठी आरोपी आणि मृतक जमले होते. मात्र चर्चेदरम्यान वाद झाला आणि वादाचा रूपांतर थेट हत्तेत झालं.
यावेळी घटनेचा सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज समोर आला असून यामध्ये कोयत्याच्या सहाय्याने आरोपी तरुणाला मारहाण करत असल्याचे दिसून आले. दरम्यान सीसीटीव्ही आणि डिजिटल पुराव्याच्या माध्यमातून या घटनेतील एकूण चार आरोपी निष्पन्न झाले आहेत यात तीन आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांनी दिली आहे. तसेच आरोपी पोलिसांना निष्पन्न झाले असून लवकरच अटक केले जाणार असल्याचे माहिती पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांनी सांगितले. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.