मुंबई मेट्रोच्या विस्तारित कामाच्या छोट्याशा भागाचा शुभारंभ गुढीपाडव्यानिमित्त मुंबईत होणार आहे. मात्र, मेट्रोच्या कार्यक्रम पत्रिकेबाबत मोठा वाद निर्माण झाला आहे. या मेट्रोच्या कार्यक्रम पत्रिकेत मुंबई मेट्रोचे विस्तारकर्ते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रणच नाही. त्यामुळे मेट्रोच्या निमंत्रण पत्रिकेवर भाजपाने आक्षेप नोंदवला आहे.
देवेंद्र फडणविस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या पुढाकारानेच मुंबई मेट्रो प्रकल्पाचा विस्तार करण्यात आला. या प्रकल्पाकच्या कामांपैकी बहुतांश काम फडणवीसांच्या देखरेखीखाली पूर्ण झाले होते. मात्र, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मेट्रोच्या कामाला खीळ बसली. त्यानंतर आता मुंबई मनपा निवडणुकीच्या तोंडावर मुंबई मेट्रोच्या एकूण प्रकल्पांपैकी दहिसर पूर्व ते अंधीर आणि डहाणूकरवाडी ते दहिसर पश्चिम अशा दोन अर्ध मार्गिका शनिवारी सुरू होणार आहेत. या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिक प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत मुंबई मेट्रोचे विस्तारकर्ते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण नसून या कार्यक्रमपत्रिकेत शिष्टाचार पाळण्याच्या निमित्ताने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे.
मुंबई मेट्रोवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. मुंबईतील मेट्रो ३चे ८० टक्के काम पूर्ण झाले असून कारशेडअभावी खोळंबा करण्यात येत आहे. मेट्रो ३ सुरू झाली नाही त र हे राज्य सरकारचे अपयश म्हणावे लागेल, तसेच मेट्रो उद्घाटनावरून श्रेयवादाची लढाई करू नये, अशी प्रतिक्रिया मुंबई मेट्रोवर देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर केली आहे.