आयपीएल 2026 चा थरार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून बुधवारी झालेल्या सामन्यात केकेआरने मुंबईला पराभूत करत आपली आशा कायम ठेवली. या विजयामुळे पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सचा पराभव झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजी करताना 8 गडी गमावून केवळ 147 धावा करता आल्या. प्रत्युत्तरात कोलकाता नाईट रायडर्सने 18.5 षटकांत 6 गडी राखून लक्ष्य गाठत 4 गडी राखून विजय मिळवला. दरम्यान या सामन्यात मुंबई इंडियन्सची ढिसाळ कामगिरी पाहायला मिळाली.
हेही वाचा- Hardik Pandya: हार्दिक पांड्याच्या अडचणीत वाढ; ‘या’ कृतीमुळे BCCI कडून कठोर कारवाई
कोलकाताच्या 10व्या ओव्हरमध्ये दीपक चहर आणि रॉबिन मिन्झ यांच्यात मोठा ड्रामा पाहायला मिळाला. कोलकाताकडून रोव्हमन पॉवेल मैदानात असताना हार्दिक पांड्याने चेंडू फेकला. तो चेंडू पॉवेलच्या बॅटला बाजूने लागून हवेत वर गेला. त्यावेळेस फिल्डिंग करत असलेल्या रॉबिन मिन्झ आणि दीपक चहर या दोघांमध्ये तू घे, नाही तूच घेचा डाव रंगला.
सहज टिपल्या जाणाऱ्या या चेंडूमागे दोघांच्या गोंधळात चेंडू खाली पडला आणि दोघांपैकी एकाला ही हा झेल घेता आला नाही. चेंडूचा झेल घेण्याऐवजी दोघेही एकमेकांच्या तोंडाकडे पाहत राहिले. यावेळी कर्णधार हार्दिक पांड्याच्या चेहऱ्यावर मात्र निराशा पाहायला मिळाली. दरम्यान मुंबई इंडियन्स संघ आधीच इंडियन प्रीमियर लीगमधून बाहेर पडला असून, संघ सध्या उर्वरित लीग सामने खेळत आहे.
#MI fielders in two minds ? Rovman Powell survives ? Updates ▶️ https://t.co/Aw11jLoww5#TATAIPL | #KhelBindaas | #KKRvMI pic.twitter.com/R3iLDNC9Iq — IndianPremierLeague (@IPL) May 20, 2026