Sangli Crime : सांगलीत निर्दयी आईनेचा पैशांसाठी कारनामा; दत्तक देण्याचा बहाणा करत पोटची दोन पोरं विकली

दत्तक देण्याचा बहाणा करत आईनेच दोन मुलांची विक्री करण्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी मुलांच्या आईसह पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Sangli Crime : सांगलीत निर्दयी आईनेचा पैशांसाठी कारनामा; दत्तक देण्याचा बहाणा करत पोटची दोन पोरं विकली

दत्तक देण्याचा बहाणा करत आईनेच दोन मुलांची विक्री करण्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी मुलांच्या आईसह पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिरजेत पोटच्या दोन पोरांची फक्त 40 हजार रुपयांना आईनेच विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी या बालकांच्या आईसह 5 जणांना मिरज शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा प्रकार दोन वर्षांपूर्वी घडलेला असून, तेव्हा ही मुले साधारण दोन वर्षे वयोगटातील असण्याचा अंदाज वर्तावण्यात येत आहे.

हेही वाचा- Solapur Crime : “हसू झालं गं माझं, जीव होता माझा…” सासरच्या जाचाला कंटाळून स्वत:ला संपवलं; पायलच्या तळहातावरील शेवटचे शब्द वाचून डोळे पाणावतील

तसेच आता ही मुले सध्या साडेतीन ते चार वर्षांची आहेत. याप्रकरणी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी रोहिणी महादेव वाघमारे यांनी मिरज शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मनिषा रोहीत जाधव, (रा. बाळुमामा मंदीराजवळ, सुभाष नगर, सांगली), उमाजी गणेश लोंढे (रा. शासकीय दुध डेअरी कॉलनी मिरज), सुरेखा चंद्रकांत लोंढे (रा. कोल्हापूर चाळ मिरज), दशरथ तुकाराम लोंढे (रा. कोल्हापूर चाळ मिरज) आणि संजय दिलीप गोसावी (रा. लक्ष्मीनगर, जुना बुधगाव रोड, सांगली) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. मिरज शहर पोलीसांनी तात्काळ तपास करुन गुन्हयातील आरोपी महिलेसह 6 जणांना तात्काळ ताब्यात घेतले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number