जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील वसतिगृह क्रमांक ८ मध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यु झाला आहे. आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, ऋषीकेष संजय आहेर असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
विद्यापीठात एम. कॉम. च्या द्वितीय वर्षात शिकत होता. अहमदनगरचा असलेला ऋषीकेष नेहमी सकाळी लवकर उठायचा सकाळी साडे 5 वाजता त्याला चक्कर आली, त्यानंतर त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.