Palghar Crime : पालघरमध्ये हृदयद्रावक घटना! जन्मदात्या आईनेच उंदीर मारण्याचे औषध पाजले आणि स्वतः…

पालघर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सतत होणाऱ्या कौटुंबिक वादातून एका महिलेने टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Palghar Crime : पालघरमध्ये हृदयद्रावक घटना! जन्मदात्या आईनेच उंदीर मारण्याचे औषध पाजले आणि स्वतः…

पालघर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सतत होणाऱ्या कौटुंबिक वादातून एका महिलेने टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सततच्या कौटुंबिक वादामुळे मानसिक तणाव वाढल्याने महिलेने स्वतःसह आपल्या दोन वर्षांच्या मुलीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. 

पालघर जिल्ह्यातील मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वसरे देऊळपाडा येथे पतीसोबत झालेल्या किरकोळ वादानंतर लक्ष्मी शेलार या महिलेने आपल्या दीड वर्षांच्या चिमुकलीला उंदीर मारण्याचे विष पाजले. त्यानंतर स्वतःही ते विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 

हेही वाचा- Panvel Crime: पनवेलमध्ये सार्वजनिक शौचालयात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; संतप्त नागरिकांनी तरुणाला दिला बेदम चोप

ही घटना उघडकीस येताच दोघींना तातडीने सेलवास येथील नमो रुग्णालया दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान लक्ष्मी शेलार यांचा मृत्यू झाला असून दीड वर्षांच्या चिमुकलीवर सेलवास येथील नमो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पालघर जिल्ह्यात कौटुंबिक वादातून अत्यंत दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

कौटुंबिक वादाचे इतके भीषण रूप धारण झाल्याने समाजातही चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मनोर पोलीस करत आहेत. पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून नेमके कारण आणि घटनेमागील परिस्थितीचा सखोल तपास सुरू केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number